22 September 2020

News Flash

अरबाज खान म्हणतो, ‘होय मी डेट करतोय पण..’

खुद्द अरबाजनेच त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली आहे.

अरबाज खान आणि त्याची कथित प्रेयसी जॉर्जिया अँड्रियानी

अभिनेता सलमान खानच्या घरातील एखादी पार्टी असो किंवा गणेश चतुर्थी, अरबाज खानसोबत एका खास पाहुणीची हजेरी सतत पाहायला मिळाली. ही खास पाहुणी म्हणजे मॉडेल जॉर्जिया अँड्रीयानी. अभिनेत्री मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जियाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा होती. आता खुद्द अरबाजनेच या चर्चा मान्य केल्या असून रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो या चर्चांबद्दल म्हणाला की, ‘तुम्ही लोकांचं तोंड बंद करू शकत नाही. एखाद्या गोष्टीवर निष्कर्ष काढण्यासाठी लोकांना फार वेळ लागत नाही. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. होय मी एका व्यक्तीला डेट करतोय पण मला कोणत्याही गोष्टीची घाई करायची नाही.’

Video : सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवशी रणवीर सिंगचा सैराट डान्स

अनेक कार्यक्रम आणि पार्टीमध्येही अरबाज आणि जॉर्जिया एकत्र दिसले. २०१९ मध्ये हे दोघं लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. पण या चर्चांना काहीच अर्थ नसून योग्य वेळी जे योग्य वाटेल ते करणार असल्याचं अरबाजनं स्पष्ट केलं. अरबाज आणि मलायका गेल्या १८ वर्षांपासून एकत्र नांदत होते. मात्र गेल्यावर्षी या दोघांनी घटस्फोट घेतला. तर दुसरीकडे मलायकासुद्धा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 1:56 pm

Web Title: arbaaz khan confirms dating giorgia andriani says he does not want to rush about anything
Next Stories
1 Video : सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवशी रणवीर सिंगचा सैराट डान्स
2 भारत हिंदुत्ववादी नसून धर्मनिरपेक्ष देश – सैफ अली खान 
3 रणवीर- दीपिकाचं लग्न इटलीत नव्हे तर मुंबईत होणार?
Just Now!
X