News Flash

अरबाज खानचे नवे ‘अफेअर’

अरबाज-मलायकाने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

अरबाज खान

सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून चर्चे आहे. अरबाज आणि त्याच्या खासगी जीवनावरुन होणाऱ्या चर्चांमध्येच आता एका नव्या विषयावरुन वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. तो विषय म्हणजे अरबाजचे ‘अफेअर’. गोंधळलात ना..? या एका शब्दावरुन गैरसमज करुन घेऊ नका. अरबाज खान लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

वाचा: ‘व्हाइट हाउस’मध्ये होणार अरबाजच्या चित्रपटाचे शूटींग

‘रेड अफेअर’ या आगामी चित्रपटामध्ये तो सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित खान यांच्या ‘रेड अफेअर’ या कादंबरीवर अरबाजच्या आगामी चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. त्यामुळेच या चित्रपटासाठी अरबाजने त्याचा होकार कळवला आहे. या चित्रपटाबद्दल सांगताना ‘चित्रपटाची पटकथा आणि संवाद खुपच आवडले आहेत आणि त्यामुळेच मी या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे’, असे अरबाज म्हणाला. अरबाज खानव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मंजिरी फडणीस, कायनात अरोरा, मुकुल देव हे कलाकारही झळकणार आहेत. तसेच या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईतच करण्यात येणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

वाचा: मॉरिशसमध्ये दिसले अरबाज आणि सनी

सध्या अरबाज खान त्याच्या विविध चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. विविध भूमिका असणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य देणाऱ्या अरबाज खानला एका चित्रपटाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच सनी लिओनीसोबत मॉरिशसला पाहण्यात आले होते. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांच्या वैवाहिक जीवनाविषयीही विविध चर्चांना सध्या उधाण आले आहे. पण, आता दोघांनीही सर्व चर्चांना पूर्णविराम गेत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघंही गेल्या आठवड्यात न्यायालयात गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी आपल्या वकिलांशी चर्चाही केली. याबरोबरच दोघांच्या वकिलांनी कागदपत्रांचे काम सुरु केले आहे. याआधीही या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने येत होत्या, पण त्यानंतरही दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी दोघांनी आपल्या मुलाचा वाढदिवस एकत्र साजराही केला होता. यावेळी संपूर्ण कुटुंबही त्या पार्टीला उपस्थित होते. मलायका अनेक दिवसांपासून आपल्या मुलासोबत वेगळी राहत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2016 6:53 pm

Web Title: arbaaz khan plays cbi officer in red affair written by hindi best seller novel writer amit khan
Next Stories
1 ‘ऐ जिंदगी गले लगा ले..’
2 Koffee With Karan Season 5: करण आणि कपिलच्या धम्माल गप्पांसाठी सज्ज व्हा
3 बहिण अर्पिताचा अपमान सलमान अजून विसरला नाही
Just Now!
X