28 November 2020

News Flash

अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अरबाजने केला मानहानीचा दावा

बॉम्बे सिव्हिल कोर्टात मानहानिचा दावा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. सोशल मीडियावर स्टार किड्सवर निशाणा साधला जात होता. अशातच दिग्दर्शक, अभिनेता अरबाज खानने सोशल मीडिया युजर्सविरोधात मानहानीचा दावा केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूशी अरबाजचे नाव जोडणाऱ्या यूजर्सविरोधात त्याने बॉम्बे सिव्हिल कोर्टात मानहानिचा दावा केला आहे. त्याने तक्रारीमध्ये सोशल मीडियावर वाटेल ते आरोप केले जात असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी साक्षी भंडारी आणि विभोर आनंद या दोन यूजर्सविरोधात अरबाजने मानहानीचा दावा केला आहे.

 

View this post on Instagram

 

Maa

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर अरबाज हा सुशांत आणि दिशाच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचे काही यूजरने म्हटले होते. या संदर्भात काही पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. तसेच या प्रकरणी त्याची सीबीआय चौकशी होणार असल्याचे एका यूजरने म्हटले होते. या सर्व अफवा पसरवल्या गेल्या असल्यामुळे अरबाजने या यूजर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे. कोर्टाने या सर्व पोस्ट सोशल मीडियावरुन हटवण्याचा आदेश दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 7:02 pm

Web Title: arbaz khan complaint against users avb 95
Next Stories
1 “दोषींना फाशी द्या”; सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार संतापला
2 केबीसी प्ले अलाँग : दररोज १० विजेते, १० लाख रूपयांचे बक्षीस
3 प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’च्या शूटिंगला होणार सुरूवात
Just Now!
X