23 September 2020

News Flash

हरभजनची पत्नी गीता देणार गोड बातमी?

दोघांच्याही चेह-यावर एक वेगळीच चमक दिसून येत होती.

गेले काही दिवस बॉलीवूडकरांकडून गोड बातम्या ऐकू येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहिदची पत्नी मीरा राजपूत ही गरोदर असल्याचे कळले. त्यानंतर आता भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्याशी विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री गीता बसरा हीदेखील गोड बातमी देणार असल्याचे कळले.
पिंकविला या संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे आयपीएलच्या उद्घाटन  सोहळ्यासाठी आले होते. तेव्हा त्या दोघांच्याही चेह-यावर एक वेगळीच चमक दिसून येत होती. त्यांच्या चेह-यावरचा आनंद आणि उत्साह पाहता नक्कीच त्यांच्याकडे गोड बातमी असल्याचे पिंकविलाने म्हटलेय.
गीता आणि भज्जी यांचे लग्न जालंधर येथे झाले होते. दिल्ली येथे झालेल्या त्यांच्या लग्नाच्या रिसेप्नशला माजी पंतप्रधानांपासून ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 2:29 pm

Web Title: are geeta basra harbhajan singh expecting
टॅग Harbhajan Singh
Next Stories
1 पाडव्याच्या मुहुर्तावर ‘देवयानी’ मध्ये प्रेमाचा गृहप्रवेश
2 आणखी एक बॉलीवूड जोडी होणार विभक्त
3 १८ वर्षे मोठ्या सहकलाकाराला डेट करतेय ‘ही’ अभिनेत्री
Just Now!
X