News Flash

‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने पोटगीसाठी मागितली ३० कोटी डॉलरची गडगंज रक्कम?

दोन वर्षांपूर्वी हे दोघेही विवाहबंधनात अडकले होते.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

यंदाच्या वर्षी अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले खरे. पण, त्याहीपेक्षा जास्त कलाकारांच्या  नात्यात संकटांचे वादळ आले आणि त्यांच्या नात्याला तडा गेला. हॉलिवूडपासून ते अगदी बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार जोड्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सेलिब्रिटी आणि त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याविषयी विविध चर्चांनाही उधाण आले आहे.

बी टाऊनप्रमाणेच सध्या हॉलिवूडमध्येही काही प्रसिद्ध जोडप्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे. अभिनेता ब्रॅड पीट आणि अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या घटस्फोटांच्या चर्चा थंडावत नाहीत तोच अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि त्याची पत्नी अमॅल अलामुद्दीन यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘ओके’, या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्यामध्ये दोन वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर मतभेद निर्माण झाले आहेत. जॉर्जच्या पत्नीने म्हणजेच अमॅलने पोटगी म्हणून त्याच्याकडे मागणी केलेल्या रकमेचा आकडा ऐकून सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अमॅलने जॉर्जकडे पोटगी म्हणून ३० कोटी डॉलर इतक्या गडगंज रकमेची मागणी केली आहे.  सोशल मीडियावरही सध्या याच विषयाची चर्चा सुरु आहे.

george-amal-clooney

वाचा: ‘या’ अभिनेत्रीसाठी हिमेश रेशमियाने घेतला घटस्फोट?

जॉर्ज आणि अमॅल यांच्या नात्यामध्ये अपत्याच्या विषयावरुन काही वाद झाल्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनांमध्ये हे वादळ आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण, ही माहिती कितपत खरी आहे याचा अद्यापही खुलासा झालेला नाही. त्यामुळे सध्या या दोघांच्याही नात्याला ही रक्कम कोणते नवे वळण देणार हेच पहावे लागेल. गेल्या दोन वर्षांपूर्वी जॉर्ज आणि अमॅल विवाहबंधनात अडकले होते. अमॅल ही एक नामवंत वकिल आहे. एका खाजगी समारंभामध्ये काही खास मित्रमंडळींच्या उपस्थितीत जॉर्ज आणि अमॅल विवाहबद्ध झाले होते. यंदाच्या वर्षी अनेक सेलिब्रिटींच्या नात्यामध्ये आलेला दुरावा पाहता हे वर्ष त्यांच्यासाठी काहीसे खास नव्हते असेच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 6:35 pm

Web Title: are george clooney and amal alamuddin headed for a 300 million divorce
Next Stories
1 मीराने केला शाहीदसोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा
2 ‘या’ अभिनेत्रीसाठी हिमेश रेशमियाने घेतला घटस्फोट?
3 #Dangal VIDEO: तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल.. ‘दंगल’चे दमदार शिर्षकगीत
Just Now!
X