अभिनेत्री जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यन यांनी ‘दोस्ताना २’ हा चित्रपट साइन केल्यापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं असून डान्स किंवा जिमसाठीसुद्धा दोघं एकमेकांसोबतच जाऊ लागलेत. केवळ चित्रपटासाठी नाही तर या दोघांमध्ये खरंच काहीतरी शिजत असल्याचं म्हटलं जात आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, जान्हवीला काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनच्या घराजवळ पाहिलं गेलं होतं. त्यावेळी जान्हवी पापाराझींना चकवा देत इमारतीच्या मागच्या गेटमधून निघून गेली. तर कार्तिकने फोटोग्राफर्ससाठी पोझ दिले. चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली असून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

आणखी वाचा : वयातील अंतरावरून टीका करणाऱ्यांना गौहर खानचं सडेतोड उत्तर

जॉन इब्राहिम, प्रियांका चोप्रा आणि अभिषेक बच्चन यांच्या ‘दोस्ताना’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये जान्हवी-कार्तिक मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. लॉकडाउनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता नवीन वर्षात ‘दोस्ताना २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर जान्हवीच्या अभिनयकौशल्यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.