News Flash

Photos: मिलिंद सोमण पुन्हा बोहल्यावर

अंकिताने पिवळ्या रंगाच्या ड्रेसवर फुलांचे दागिने घातले आहेत. तर मिलिंदने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघंही आनंदाने बेभान होऊन नाचताना दिसत आहेत

मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार

अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची प्रेयसी अंकिता कोनवार या दोघांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. एकीकडे ते २१ तारखएला अलिबागमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या तर दुसरीकडे अंकिताने मिलिंदसोबतचे नाते संपवल्याच्याही बातम्या कानावर पडत होत्या. या सगळ्या गदारोळात काय खरं आणि काय खोटं हेच कळत नव्हतं. पण आम्ही तुम्हाला आता एक असा फोटो दाखवणार आहोत ज्यावरून मिलिंद आणि अंकिता यांच्यातला दुरावा कायमचाच संपल्याचे दिसेल.

हो.. मिलिंद आणि अंकिता आज २१ एप्रिलला अलिबाग येथे लग्न बंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोघंही अलिबागमध्ये आपल्या लग्नाची तयारी करताना दिसत आहेत. त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मेहंदी सेरेमनीपासून ते हळदीपर्यंत सगळे कार्यक्रम अगदी धूमधडाक्यात पार पडताना दिसत आहेत.

फोटोग्राफर अंजू केपी नामक व्यक्तिने मेहंदीने भरलेल्या हाताने मिलिंदला पाहतानाचा अंकिताचा फोटो अपलोड केला आहे. यानंतर अंकिताचा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला एक फोटो व्हायरल होत आहे. फोटो पाहून हा हळदीच्या समारंभाचा फोटो आहे असे नक्कीच वाटते.

अंकिताने पिवळ्या रंगाच्या ड्रेसवर फुलांचे दागिने घातले आहेत. तर मिलिंदने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघंही आनंदाने बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. एकंदरीत मेहंदी आणि हळदीचे फोटो पाहून आज हे दोघं विवाहबंधनात अडकतील असेच म्हटले जात आहे. पण अजूनही मिलिंद आणि अंकिताने या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

काहीच दिवसांपूर्वी ५२ वर्षीय मिलिंदने २७ वर्षीय अंकिताशी साखरपुडा केल्याचे म्हटले जात होते. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने मिलिंदचा हात पकडलेला दिसतो. हातात हात पकडलेला तिच्या फोटोपेक्षा मिलिंदच्या चाहत्यांचे अंकिताच्या अंगठीकडे अधिक लक्ष जाते. तिच्या अंगठीकडेच पाहून दोघांनी साखरपुडा केल्याचे म्हटले जात होते.

रिपोर्ट्सनुसार, अंकिता आणि मिलिंदमधील वयाचा फरक लक्षात घेता अंकिताच्या कुटुंबियांकडून या नात्याला विरोध केला जात होता. म्हणून काही दिवसांपूर्वी मिलिंद अंकिताच्या कुटुंबियांना भेटला होता. त्यांच्याशी बोलल्यानंतर अंकिताच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला हिरवा कंदील दिला. यावर्षी हे प्रेमीयुगुल लग्नबंधनात अडकतील असेही म्हटले जात आहे.

मिलिंद सोमण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. लोकांच्या मतांची फारशी पर्वा न करता तो अनेकदा अंकितासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. प्रेमाला वयाची मर्यादा नसते, अशा मतावर ठाम असणाऱ्या मिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. तीन वर्षाच्या संसारानंतर त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

सोशल मीडियावर त्यांच्या नात्यांबद्दल फारशा सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत नाही. मात्र, तरीही मिलिंद त्यांच्या नात्याबद्दल ठाम आहे. मिलिंदच्या प्रेयसीचे खरे नाव अंकिता नसून संकुस्मिता कोनवार आहे. संकुस्मिता २०१३ पासून एका एअरलाइनमध्ये ‘केबिन क्रू’ म्हणून काम करते आहे. मिलिंदने अलिशा चिनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 3:24 pm

Web Title: are milind soman ankita konwar getting married in alibaug see photos
Next Stories
1 Video: अभिषेकचा फोन चोरुन पाहायची ऐश्वर्या? अनेक प्रश्नांची दिली उत्तरं
2 पुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा
3 अनोख्या रंगसंगतीने खुललं ‘रणांगण’
Just Now!
X