06 March 2021

News Flash

दीपिका-रणवीर लवकरच देणार गोड बातमी?; दीपिकाने पोस्ट केलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण

१४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी या दोघांचे लग्न झालं

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारं जोडपं म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग. सध्या लॉकडाउनचा फटका मनोरंजन सृष्टीलाही बसला असून चित्रिकरणचे सर्वच काम ठप्प आहे. अनेक कलाकारांप्रमाणे दीपिका आणि रणवीरही घरीच बसूनच आहेत. असं असलं तरी ते सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. घरामधील तसेच जुने काही फोटो हे दोघे आपल्या इन्स्ताग्रामवरुन अनेकदा पोस्ट करत असतात. मात्र दीपिकाने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोवरुन या दोघांकडे गोड बातमी आहे का असा प्रश्न या दोघांच्या चाहत्यांना पडला आहे.

दीपिका आणि रणवीरला त्यांचे चाहते दिपवीर या नावाने हाक मारतात. १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी या दोघांचे लग्न झालं. त्यानंतर हे दोघेही आपआपल्या कामात व्यस्त झाले. अनेक ठिकाणी हे दोघे आपआपल्या वेळापत्रकाप्रमाणे चित्रिकरणासाठी, पुरस्कार सोहळ्यांसाठी फिरताना दिसले. अगदीच कधीतरी हे दोघे एकत्र दिसून आले. त्यामुळेच आता या लॉकडाउनच्या निमित्ताने दोघांना एकमेकांबरोबर बराच वेळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. हे दोघेही होम क्वारंटाइनमध्ये काय करत आहेत याबद्दलची माहिती ते आपल्या चाहत्यांना इन्स्ताग्रामवरुन देत आहेत. अनेकदा हे दोघे त्यांच्या सकाळच्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. दीपिकाने नुकताच एक फोटो आपल्या इन्स्ताग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दीपिकाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एका प्लेटमध्ये मिर्ची मसाला, मीठ टाकलेल्या कच्च्या कैरीच्या फोडी दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना दीपिकाने “हे सर्वात उत्तम आहे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा हे सर्वोत्तम आहे. आजपर्यंत मला भेटलेल्या सर्व गोष्टींमध्ये ही सर्वोत्तम गोष्ट आहे,” असं कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

You’re simply the best, better than all the rest Better than anyone, anyone I ever met…

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने शेअर केलेला फोटोमध्ये कापलेल्या कैरीच्या फोडी दिसत आहेत. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन कच्ची कैरीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. यामध्ये अगदी श्रद्धा कपूर, अमृता सुभाष या कलाकारांचा समावेश आहे. मात्र सुतावरुन स्वर्ग गाठावा त्याप्रमाणे काही चाहत्यांनी या फोटोचा संबंध थेट दीपिका आणि रणवीर लवकरच काहीतरी गोड बातमी देणार असल्याशी लावल्याचे कमेंटमधून दिसत आहे. दीपिका आणि रणवीरची मैत्रिण असणारी भावना जसरा हिनेही कमेंट करुन, “तुम्ही एकदम फिल्मी स्टाइलमध्ये गोड बातमी देत आहात का?” असा सवाल केला आहे.

इतरही अनेक चाहत्यांनी असाच प्रश्न कमेंटमधून विचारला आहे. गोड बातमी आहे का?, तू गरोदर आहेस का?, नवा पाहुणा येणार आहे का अशा पद्धतीच्या अनेक कमेंट या पोस्टवर दिसून येत आहेत. त्यापैकी काही प्रतिनिधिक कमेंटचा स्क्रीनशॉर्ट खाली पाहा…

दीपिका आणि रणवीर गोड बातमी देणार असल्याची कोणताही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नसली तरी त्यांच्या चाहत्यांनीच यासंदर्भात विचारणा सुरु केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. करोनामुळे दीपिका आणि रणवीर यांच्या ‘८३’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित या चित्रपटामध्ये रणवीरने तत्कालीन भारतीय कर्णधार कपील देव यांची भूमिका साकारली आहे. तर त्याच्या रियल लाइफ पत्नी चित्रपटामध्येही पत्नीच्याच भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 8:33 am

Web Title: are you pregnant fans ask after deepika padukone shares a picture of raw mangoes scsg 91
Next Stories
1 तारांगण घरात : वाचन आणि अभिवाचन 
2 चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणाला नवे रुपडे
3 आमिर खानच्या मुलीनं शेअर केले साडीतील फोटो; लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
Just Now!
X