बॉलिवूड चित्रपटांचे क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर भारता बाहेरही पाहायला मिळते. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान एक ग्लोबल आयकॉन म्हणून ओळखला जातो आणि त्याचे चाहते संपूर्ण जगभर असल्याचे पाहाला मिळते. शाहरुखच्या चित्रपटांमधील गाणी तर संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहेत. अर्जेंटीनाच्या फूटबॉलपटूने शेअर केलेल्या व्हिडीओवरुन हे सिद्ध झाले आहे. या व्हिडीओमध्ये हा फूटबॉलपटू ९०च्या दशकातील शाहरुखच्या गाण्यावर थिरकाताना दिसत आहे.

Watford FCने त्यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रॉबर्टो परेरा (Roberto Pereyra) शाहरुख खानच्या ‘बाजीगर ओ बाजीगर’ या थिरकताना दिसत आहे. दरम्यान रॉबर्टोचा डान्स पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ ५१ सेकंदाचा आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रध्वज दाखवण्यात आला असून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. रॉबर्टो अभिनेत्री, मॅडेल आणि टिक-टॉक स्टार राधिका बंगियासोबत नाचताना दिसत आहे. रॉबर्टोने व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केल्याचे दिसत आहे. व्हिडीओमधील दोघांची केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे. त्यांच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रॉबर्टो परेराने २०१६मध्ये जुव्हेंटस सोडून व्हॅटफोर्ड संघात प्रवेश केला. त्यानंतर आपल्या अष्टपैलू खेळीवर त्याने प्रीमियम लीग स्पर्धा चांगलीच गाजवली. बचाव फळीचा हा खेळाडू आक्रम फळीमध्ये देखील तितकीच चांगली कमागिरी करत चाहत्यांची मने जिंकतो.

‘बाजीग ओ बाजीगर’ हे गाणे १९९३मध्ये सुपरहिट ठरलेला चित्रपट ‘बाजीगर’ मधील आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह अभिनेत्री काजोल आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. पण त्याची ही वेगळी भूमिका प्रेक्षकांच्या मनाली चांगलीच भावली होती.