News Flash

Arijit Singh Birthday Special : रिअॅलिटी शोमधील पराभवानंतरही बनला नंबर वन गायक!

अरिजितला खरी ओळख 'आशिकी २'मधील 'तुम ही हो' या गाण्याने दिली.

अरिजित सिंग

अरिजित सिंगचा जन्म २५ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झाला. त्याचे वडील पंजाबी तर आई बंगाली आहे. सोनी वाहिनीवरील ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोद्वारे २००५ मध्ये अरिजितने संगीतातील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु, हा शो त्याला जिंकता आला नाही. हार न मानता त्याने ‘१० के १० ले गए दिल’ या अन्य रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. या शोचादेखील तो विजेता होऊ शकला नाही. या शोमध्ये त्याचा सामना दुसऱ्या रिअॅलिटी शोच्या विजेत्यांबरोबर होता. बऱ्याच काळपर्यंत अरिजितने सहायक संगीत प्रोग्रॅमर म्हणून शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर आणि मिथुन या दिग्गज्यांबरोबर काम केले. २०११ मध्ये ‘मर्डर २’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ गाण्याद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये गायक म्हणून सुरुवात केली. यानंतर अरिजितने संगीतकार प्रीतमबरोबर ‘एजंट विनोद’, ‘प्लेअर्स’, ‘कॉकटेल’ आणि ‘बर्फी’सारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली. अरिजितला खरी ओळख ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ या गाण्याने दिली. या गाण्यासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. २०१४ मध्ये त्याने प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानबरोबरदेखील काम केले. अरिजित जगभरात गाण्याचे कार्यक्रम सादर करत असून, त्याला ऐकण्यासाठी लोखोंच्या संख्येत चाहते उपस्थित असतात.

द अरिजित सिंग

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 7:06 pm

Web Title: arijit singh birthday special
Next Stories
1 ह्रतिकने शेअर केले अमिताभ यांच्यासोबतचे बालपणीचे छायाचित्र
2 आर. माधवनचा मुलगा गिरवणार बॉक्सिंगचे धडे!
3 ‘…तर सलमान खान शाहरूखचा स्टारपदाचा मुकूट हिरावून घेईल’
Just Now!
X