बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. मुंबई पोलीस, बिहार पोलीस, ईडी अन् आता सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर सुशांतचा मित्र अभिनेता अर्जुन बिजलानी याने प्रतिक्रिया दिली आहे. खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत मला झोप लागणार नाही असं त्याने म्हटलं आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: स्वरा भास्करचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा

अवश्य पाहा – Video : मराठीतलं पहिलं देशभक्तीपर रँप साँग पाहिलं ‘का?’

अर्जुन बिजलानी एक टिव्ही अभिनेता आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्याने सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. “सुशांतसोबत खुपच वाईट झालं. तो केवळ चांगला अभिनेताच नव्हता तर एक चांगला मित्र देखील होता. त्याच्याबद्दल सतत माझ्या डोक्यात विचार येतात. या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत मला झोप लागणार नाही.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

 

View this post on Instagram

 

#warriorsforssr #justiceforsushantsinghrajput .

A post shared by Arjun Bijlani (@arjunbijlani) on

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रिया आणि AU मध्ये ६३ फोन कॉल्स झाले. AU ही रियाची फॅमेली फ्रेंड असून तिचं नाव अनन्या उधास आहे. परंतु, रिया आणि अनन्यामध्ये इतक्या वेळा फोन का झाले हे अद्याप स्पष्ट न झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, रियाचे फोन कॉल्स रेकॉर्ड तपासल्यावर तिने महेश भट्ट यांनीदेखील फोन केले होते. तसंच तिने वडिलांना सर्वाधिक फोन केल्याचं पाहायला मिळालं.