28 February 2021

News Flash

अर्जुन बिजलानीच्या पत्नीला करोनाची लागण

अर्जुनने ट्विट करत याबद्दलची दिली माहिती

अर्जुन बिजलानी व त्याची पत्नी नेहा

छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीच्या पत्नीला करोनाची लागण झाली आहे. अर्जुन आणि त्याचे कुटुंबीय पुढच्या दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइनमध्ये राहत आहेत. त्याचसोबत त्याच्या संपर्कात आलेल्यांनी करोनाची चाचणी करून घ्यावी असा सल्ला त्याने दिलाय. अर्जुनने ट्विट करत पत्नी नेहा स्वामीला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली.

‘माझ्या पत्नीचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आणि माझे कुटुंबीय पुढील १४ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये आहोत. आमच्या संपर्कात आलेल्यांनी कृपया करोना चाचणी करून घ्यावी. आम्ही ठीक आहोत’, असं तो ट्विट करत म्हणाला.

मे महिन्यात अर्जुनच्या इमारतीतील एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याने इमारत सील करण्यात आली होती. त्यावेळी पाच वर्षीय मुलाची चिंता अधिक वाटत असल्याचं त्याने म्हटलं होतं. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मला पाच वर्षांचा मुलगा असल्याने, त्याची मला खूप जास्त काळजी आहे. पण मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणार आहे. घरात पाळीव प्राणी असलं की क्वारंटाइनमध्ये राहणं थोडं अवघड होतं. माझ्या घरी एक कुत्रा आहे आणि त्याला सोडून पूर्ण वेळ क्वारंटाइनमध्ये राहणं खूप आव्हानात्मक आहे.”

अर्जुन बिजलानीने ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘मिले जब हम तुम’, ‘मेरी आशिकी तुम से ही’, ‘नागिन’, ‘परदेस मे है मेरा दिल’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. २०१६ मध्ये त्याने ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 7:58 am

Web Title: arjun bijlani wife neha swami tests positive for covid 19 ssv 92
Next Stories
1 ‘चांगले संस्कारच रोखू शकतात बलात्कार’ म्हणणाऱ्या आमदारावर भडकल्या अभिनेत्री
2 संजय राऊतांनी ट्विट केला कुणाल कामरासोबतचा फोटो
3 ‘…या वयातही’, व्हिडीओ शेअर करताच अमिषा पटेल झाली ट्रोल
Just Now!
X