News Flash

‘हाफ गर्लफ्रेण्ड’चे शुटिंग अमेरिकेत सुरु

अर्जुनने त्याचा स्वतःचा एक फोटो इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केला आहे

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आगामी सिनेमा ‘हाफ गर्लफ्रेण्ड’चे पुढचे शुटिंग अमेरिकेत सुरु झाले आहे. याआधी ते केप टाऊनमध्ये शुटिंग करत होते. केप टाऊनच्या शुटिंगनंतर अर्जुनरे काही दिवस आराम केला आणि आता तो अमेरिकेतल्या पुढच्या शुटिंगसाठी सज्ज झाला आहे. अर्जुनने चेतन भगतसोबत एक फोटो काढला. चेतनने हा फोटो त्याच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. चेतनने हा फोटो ट्विट केल्यानंतर अर्जुनने या ट्विटला रिट्विट केले. याशिवाय अर्जुनने त्याचा स्वतःचा एक फोटो इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केला आहे ज्यात त्याने न्यूयॉर्क सिटीला आपले घर मानले आहे. चेतन भगतच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या पुस्तकावर हा सिनेमा बनत आहे. पुस्तकातील कथानकानुसार प्रियकर आपल्या प्रेयसीला शोधत न्यूयॉर्कमध्ये येतो आणि त्याची भेट लेखक चेतन भगतशी होते.
‘हाफ गर्लफ्रेण्ड’ सिनेमाच्या सेटवर अर्जुनच्या बेजबाबदार वागण्यामुळे ‘हाफ गर्लफ्रेण्ड’चा दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या नाकीनऊ आले असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आहेत. त्याच्या या बेजबाबदार वागण्यामुळे या दोघांमध्ये वादही झाले होते.
‘हाफ गर्लफ्रेण्ड’च्या पहिल्या शेड्युलचे शुटींग दिल्लीत पार पडले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील याच शुटींग दरम्यान अर्जुनच्या रोजच्या पार्ट्या आणि कामात त्याचा होणारा परिणाम यामुळे भरपूर रिटेक्स व्हायचे. त्याच्या याच रिटेक्समुळे मोहित जाम वैतागला होता. केवळ अर्जुनच्या सेटवर उशीरा येण्याची बाब असतील तर कदाचित मोहितने त्याकडे दुर्लक्षही केले असते. पण गोष्ट अर्जुनच्या सादरीकरणाची होती. तो अपेक्षेप्रमाणे सादरीकरण करत नसल्यामुळे त्याचा त्रास इतरांना होत होता. यामुळे मोहितचा पारा चढला आणि त्याने अर्जुनला चांगलेच सुनावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2016 8:39 pm

Web Title: arjun kapoor and chetan bhagat reached new york for the shooting of upcoming film half girlfriend
Next Stories
1 ‘कॉफी विथ करण’चे ६ वे पर्व लवकरच
2 ‘सात उचक्के’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित
3 ‘रॉक ऑन २’ चे दुसरे पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X