09 December 2019

News Flash

कतरिनाच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली

कतरिना या फोटोमध्ये अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आज १६ जुलै रोजी तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने या खास दिनानिमित्त तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. दरम्यान अभिनेता अर्जुन कपूरने तिच्या या फोटोवर कमेंट करत खिल्ली उडवली आहे.

कतरिनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिनाने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे. दरम्यान अभिनेता अर्जुन कपूरने कतरिनाच्या या फोटोवर कमेंट केली आहे. तू तिकडे फोटोशूटसाठी गेली आहेस का? असे म्हणत अर्जुनने कतरिनाची खिल्ली उडवली आहे.

View this post on Instagram

🎂+ 🇲🇽 =💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

कतरिना तिचा वाढदिवस तिच्या खास मित्रांसह साजरा करत असल्याचे म्हटले जात आहे. कतरिनासाठी वाढदिवस म्हणजे एखाद्या छान ठिकाणी जाऊन आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणे. तिचा हा वाढदिवससुद्धा ती असाच साजरा करणार आहे. समाजमाध्यमं आणि ग्लॅमरविश्व दोन्हीचं दडपण घेऊन वावरणं तिला अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच या दोन्ही गोष्टींपासून ती अंतर राखून आहे.

First Published on July 16, 2019 5:19 pm

Web Title: arjun kapoor commented on katrina kaif photo avb 95
Just Now!
X