News Flash

CONTROVERSIAL : ‘नमस्ते इंग्लंड’ वादाच्या भोवऱ्यात; दाखवला भारताचा चुकीचा नकाशा

चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

'नमस्ते इंग्लंड' वादाच्या भोवऱ्यात; दाखवला भारताचा चुकीचा नकाशा

अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

या पोस्टरच्या उजव्या बाजूला असलेल्या भारताच्या नकाशावरील जम्मू- काश्मीर राज्यातील अक्साई चीन हा भागच दाखवला गेला नाही. देशाचा नकाशा चुकीचा दाखवल्याप्रकरणी या चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप यासंदर्भात कोणतंच विधान करण्यात आलेलं नाही. भारताचा चुकीचा नकाशा दाखवणं हे कायद्यानुसार राष्ट्रीय नकाशा धोरणाचं उल्लंघन मानलं जातं.

पोस्टरवरील नकाशात अक्साई चीन हा भाग दाखवण्यात आला नाही. जम्मू- काश्मीरमधील अक्साई चीन या भागावरून भारत आणि चीनदरम्यान वाद सुरू आहेत. सीमाप्रश्नावरून भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत. या सीमा वादावर भारत- चीन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तरीही यावर कोणताही तोडगा अजूनपर्यंत निघालेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 11:49 am

Web Title: arjun kapoor parineeti chopra namaste england poster cuts out a portion of india from map
Next Stories
1 प्रियांकाला भेटण्यासाठी निक जोनास सहकुटुंब येणार भारतात
2 Manikarnika first poster : खूब लडी मर्दानी झांसी की राणी!
3 ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ची ‘चि. सौ. कां. रंगभूमी’वर मोहोर
Just Now!
X