News Flash

‘तू परत येना प्लीज’, आईच्या आठवणीत अर्जुन झाला भावुक

मोना शौर्यी कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आहेत.

(Photo credit : arjun kapoor instagram)

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अर्जुनने त्यांच्या आईच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट शेअर करत तिची आठवण येत असल्याचे सांगितले आहे. त्याच्या आईचे नाव मोना शौर्यी आहे. त्या निर्माता बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.

अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या आईचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत त्याच्या आईने लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. “आता ९ वर्षे झाली आहेत, हे योग्य नाही, मला तुझी आठवण येते कृपया तू परत येना…तू माझी चिंता करायचीस, तू फोन केल्यावर तुझ नाव माझ्या फोनवर दिसायचं त्याची मला आठवण येत आहे, घरी आल्यावर तुला पाहणं याची मला आठवण येते….मला तुझं हसू आठवत आहे, तू अर्जुन बोलायचीस त्या आवाजाची मला आठवण येत आहे. आई मला तुझी खूप आठवण येते, मला आशा आहे की तू जिथेपण आहेस तिथे ठिक आहेस, मी ही पहिले सारखा होण्याचा प्रयत्न करत आहे. पण तू परत ये ना मला तुझी आठवण येत आहे.” अशा आशयाचं कॅप्शन अर्जुनने त्या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या काही महिन्यांपूर्वीच अर्जुनच्या आईचे निधन झाले होते. ‘इशाकजादे’ या चित्रपटातून अर्जुनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अर्जुन आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 1:10 pm

Web Title: arjun kapoor remembers mom mona kapoor on her ninth death anniversary says i miss you maa come back na please dcp 98
Next Stories
1 नेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ व्हायरल
2 ‘बोल्ड सीन देण्यास माझा नकार नाही, पण…’, नेहा पेंडसेचा खुलास
3 अनिल कपूर यांनी पत्नीला दिली ‘ही’ महागडी कार गिफ्ट; किंमत आहे…
Just Now!
X