News Flash

दोघात तिसरा आता सगळं विसरा

व्यवसायिकासोबत मलायका डेटींग करतेय.

अर्जुन आणि मलायका अरोरा

नवीन वर्षाची सुरुवात ब-याच बॉलिवूड जोड्या विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी झाली. फरहान अख्तर आणि अधुना यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर अरबाज आणि मलायका हेदेखील विभक्तत होणार असल्याचे वृत्त समोर आले. अरबाज-मलायकामध्ये आता तिसरा व्यक्ती आल्याचे कळते. बॉलिवूडची अतुट प्रेमाची जोडी समजली जाणारी ही जोडी फुटण्यामागे अर्जुन कपूर असल्याचे सांगण्यात येते.
अर्जुन आणि मलायका अरोरा खान यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे अरबाजचा १७ वर्षांचा संसार संपुष्टात येण्याची शक्यता आहे. युकेच्या एका व्यवसायिकासोबत मलायका डेटींग करीत असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी मलायका आणि अरबाज यांनी ‘पावर कपल’ हा टीव्ही शो होस्ट केला होता. पण मध्येच मलायकाने हा शो सोडून दिला. त्यानंतर मलायकाने त्यांचे वांद्र्यातील घरही सोडले. त्यामुळे अरबाज-मलायकाच्या नात्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2016 1:40 pm

Web Title: arjun kapoor responsible for malaika arora arbaaz khans divorce
Next Stories
1 सलमानने कतरिनाला दिला आश्चर्याचा धक्का!
2 नर्गिसला वाचवण्यासाठी सरसावला इमरान हाश्मी
3 ७० वर्षीय कबीर बेदी चौथ्यांदा होणार बाबा!
Just Now!
X