News Flash

Photo : ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’मधील अर्जुनचा नवा लूक एकदा पाहाच

६ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असे म्हटले जात आहे

सध्या अर्जुन कपूर त्याचा आगमी चित्रपट ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ची तयारीमध्ये व्यग्र आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी अर्जुन जीममध्ये घाम गाळत असल्याचे म्हटले जात होते. आता अर्जुनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहता अर्जुनने चित्रपटातील भूमिकेसाठी वजन वाढवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकताच अर्जुनने इन्स्टाग्राम खात्यावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुनने शर्ट परिधान केलेला नसून त्याने त्याच्या शरीर यष्ठीसाठी घेतलेली मेहनत दिसत आहे. त्याच्या या फोटोने अनेक तरुणींची मने जिंकली आहेत. तसेच फोटो शेअर करताना ‘Warrior mode on! #Panipat’ असे कॅप्शन दिले आहे.

अर्जुनच्या या फोटोवर अनन्या पांडे, सुनिल आणि संजय कपूर, वाणी कपूर, रोहित शेट्टी अशा अनेक बॉलिवूडच्या कलाकरांनी कमेंट केल्या आहेत. अर्जुनची ही पोस्ट अनेक तरुणांसाठी एक प्रेरणादायी पोस्ट देखील ठरली आहे.

‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर करत आहेत. तसेच या चित्रपटाच्या सेटसाठी सुयोग्य जागा निवडण्यासाठी आशुतोष यांची धडपड होती. शेवटी कर्जत इथल्या एनडी स्टुडिओत या चित्रपटाच्या सेटची उभारली गेली आहे. आशुतोषच्या या चित्रपटातून अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सनॉन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ६ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असे म्हटले जात होते. मात्र आता त्यासाठी आणखी अवधी लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 1:25 pm

Web Title: arjun kapoor share shirtless photo on instagram avb 95
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेला सोडायचं बिग बॉसचं घर ?
2 मुंबई सागा : अंडरवर्ल्डचे रहस्य उलगडणार तगडी स्टारकास्ट
3 ‘वेदनम’च्या रिमेकमध्ये दिसणार जॉन अब्राहम?
Just Now!
X