अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टीव असतो. सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या पोस्ट करून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. तसचं अर्जुन कपूर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना मागे हटत नाही. अर्जुनने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे. नुकतच अर्जुनने त्याला ट्रोल करणाऱ्याला योग्य उत्तर दिलं आहे. अर्जुनला त्याची एका दिवसाची कमाई विचारणाऱ्याला अर्जुनने उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे.

अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या एका लहान मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहन त्याने या पोस्टमधून केलं होतं. अर्जुनच्या या पोस्टवर अनेकांनी त्याचं कौतुक केलं. तसंच मदतीसाठी पुढे येण्याची इच्छा दर्शवली. मात्र काही नेटकऱ्यांनी या पोस्टनंतर अर्जुनला ट्रोल करण्यास सुरुवात केली. इतरांना आवाहन करण्यापेक्षा अर्जुनने स्वत: मदत करावी, तसचं अर्जुन सहज या मुलाला मदत करु शकतो अशा आशयाच्या कमेंट करत अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुनच्या या पोस्टवर त्याला ट्रोल करणाऱ्यांना अर्जुनने चांगल्याच शब्दात सुनावलंय. एक युजर अर्जुनला म्हणाला की “तुझी एका दिवसाची कमाई त्याला सहज वाचवू शकते.” यावर अर्जुन कपूरने या युजरला उत्तर दिलं आहे. ” खरं तर मी दिवसाला 16 कोटी रुपये कमवत असतो तर मला नक्कीच ही पोस्ट करण्याची गरज पडली नसती. पण मला माहितेय मला 16 कोटींची मदत करणं शक्य होणार नाही . म्हणून मी माझ्या परीने मदत केली आहे. माझा देणगी दिल्यानंतरच मी मदतीचं आवाहन केलं आहे. त्यापेक्षा मदत करा आणि त्याला मदत करण्यासाठी सकारात्मक हालचाल करा.” असं उत्तर देत अर्जुनने युजरची बोलती बंद केली आहे.

अर्जुनच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. या नेटकऱ्यांनी अर्जुन हे फक्त त्याच्या फायद्यासाठी आणि लोकप्रियतेसाठी करत असल्याची कमेंट केली आहे. या युजरलादेखील अर्जुनने उत्तर दिलंय.” खरं तर मित्रा हे मी फक्त त्या मुलाच्या फायद्यासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी करतोय.” असं उत्तर अर्जुनने ट्रोल करणाऱ्याला दिलंय.

अर्जुन कपूर सध्या अनेक सिनेमांच्या प्रोजेक्टवर काम करतोय. सध्या तो त्याच्या आगामी ‘एक व्हिलन-2’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्यात आहे. तर त्याच्या ‘भूत पोलीस’ या हॉरर कॉमेडी सिनेमात शूटिंग त्याने नुकतच पूर्ण केलंय.