News Flash

जान्हवीच्या ड्रेसवर अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या वेबसाइटला अर्जुनने सुनावले खडेबोल

'तुमची नजर अशा प्रकारच्या गोष्टींच्या शोधात असते, हे लज्जास्पद आहे.'

अर्जुन कपूर

बहिण जान्हवी कपूरच्या कपड्यांवरून अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या एका वेबसाइटला अभिनेता अर्जुन कपूरने खडेबोल सुनावले आहेत. बुधवारी रात्री जान्हवी आणि खुशी मुंबईतील अर्जुनच्या घरी पोहोचल्या होत्या. त्यावेळी काही प्रसारमाध्यमांनी त्यांचे छायाचित्र टिपले. अशातच एका वेबसाइटने जान्हवीने त्यावेळी परिधान केलेल्या कपड्यांवरून शेरेबाजी करत वृत्त दिले. हे वृत्त वाचताच अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.

‘तुमची नजर अशा प्रकारच्या गोष्टींच्या शोधात असते, हे लज्जास्पद आहे. खरंच, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. देशात तरुणींकडे अजूनही कशा पद्धतीने पाहिलं जातं, हे याचं ज्वलंत उदाहरण आहे,’ असं ट्विट त्याने केलं.

वाचा : स्वत:ला हिंदू म्हणवणाऱ्यांची लाज वाटतेय; कठुआ बलात्कारप्रकरणी सेलिब्रिटी भडकले

अर्जुन कपूर आणि अंशुला ही बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीची मुलं आहेत. अर्जुन जेव्हा ११ वर्षांचा होता तेव्हा बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सावत्र आई आणि बहिणींशी काही खास नाते नाही, हे याआधीही अनेक मुलाखतींमध्ये त्याने स्पष्ट केले होते. मात्र, श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन आणि अंशुला हे वडिलांच्या पाठी खंबीरपणे उभे राहिल्याचे पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2018 7:34 pm

Web Title: arjun kapoor slams a website for its derogatory remarks on sister janhvi kapoor
Next Stories
1 ‘शतदा प्रेम करावे’ मालिकेत आता सायलीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
2 आत्मपरिक्षण करायला लावणाऱ्या ‘सायकल’चा ट्रेलर प्रदर्शित
3 ‘मसान’ फेम अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
Just Now!
X