25 November 2020

News Flash

”दुसऱ्यांवरच ट्विट करणार की कामसुद्धा करणार,” असं म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अर्जुनचं मजेशीर उत्तर

अर्जुनच्या या उत्तराचं नेटकऱ्यांनीही कौतुक केलं आहे.

अर्जुन कपूर

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अर्जुन कपूरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अर्जुन पडद्यावर जितक्या गंभीर भूमिका साकारताना दिसतो, खऱ्या आयुष्यात त्याचा स्वभाव तितकाच मजेशीर आहे. अभिनेत्रींना त्यांच्या फोटोवरून चिडवणं, एखाद्याची टेर खेचणं, मस्करी करणं हे त्याचं नेहमीच चालू असतं. पण त्याच्या याच गोष्टीवर एका ट्विटर युजरने खिल्ली उडवली आहे. मात्र ही खिल्लीसुद्धा नकारात्मक दृष्टीकोनातून न बघता अर्जुनने तिला गमतीशीर उत्तर दिलं आहे.

”भाई तू दुसरों पर ट्विट ही करता रहेगा या अपनी कोई फिल्म भी करेगा,” असं ट्विट एका युजरने केलं. त्यावर अर्जुनने तिला म्हटलं, ”दुसऱ्यांच्या कामाला प्रोत्हासन देणं नेहमीच चांगलं असतं. नेहमीच स्वत:बद्दल विचार न करता, माझीच प्रसिद्धी न करता, नि: स्वार्थ राहण्याइतपत काम मी आधीच केलं आहे.” अर्जुनच्या या उत्तराचं नेटकऱ्यांनीही कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : बॉडीगार्डशी उद्दामपणे वागणाऱ्या आलियावर नेटकरी भडकले

अर्जुनच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास तो सध्या ‘पानिपत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अर्जुन त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अभिनेत्री मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिल्यानंतर हे दोघंही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 4:45 pm

Web Title: arjun kapoor swag reply to a netizen who trolled him for teasing others on social media ssv 92
Next Stories
1 वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल फक्त काळालाच कळते
2 …म्हणून लग्नानंतरही १२ वर्षे मंदिरा बेदी होऊ शकली नाही आई
3 Video: बॉडीगार्डशी उद्दामपणे वागणाऱ्या आलियावर नेटकरी भडकले
Just Now!
X