अभिनेता अर्जुन कपूर प्रेयसी मलायका अरोरामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी तो चक्क ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ या सुपरहिरोपटातील खलनायक थेनॉसमुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या पटकथेनुसार संपूर्ण ब्रम्हांडाची निर्मिती करणारे इन्फिनिटी स्टोन थेनॉसजवळ होते. मात्र तरीही या सुपरखलनायकाला सृष्टीचा नाश करता आला नाही. यामागे सुपरहिरोंचा हात होता का? तर नाही, यामागचं खरं कारण अर्जुन कपूरने सांगितलं आहे.

लॉकडाउनमुळे घरात बसलेला अर्जुन सध्या गाजलेले चित्रपट पाहून आपला वेळ घालवत आहे. अलिकडेच त्याने ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट पाहिला. या चित्रपटात देखील इतर कथांप्रमाणेच असत्यावर सत्याचा विजय होतो. मात्र अर्जुनच्या मते याचं श्रेय सुपरहिरोंना जात नाही. तर कुणा दुसऱ्याच व्यक्तीला जातं. हा व्यक्ती कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी हा गंमतीशीर व्हिडीओ पाहा.

 

View this post on Instagram

 

The OG Avenger Creator: @dipraj_jadhav_edits

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या सुपरहिरोपटात तब्बल ३३ सुपरहिरो झळकले होते. या चित्रपटाला दोन भागांमध्ये तयार करण्यात आले होते. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी कमाईचे सर्व विक्रम मोडून टाकले. यामध्ये खलनायक थेनॉसची भूमिका अभिनेता जॉश ब्रोलिन यांनी साकारली होती. त्यांच्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती.