News Flash

सलमानशी बिघडलेले नाते नव्याने जोडण्याचा अर्जुन कपूरचा प्रयत्न

सलमानसोबतच्या संबंधांमुळेच बोनी यांनी अर्जुनला मलायकापासून दूर राहण्यास सांगितले होते. पण अर्जुनने मात्र काही ऐकले नाही

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चांमुळे सलमान आणि अर्जुनच्या नात्यात कटुता आली होती. पण आता अर्जुन सलमानसोबत बिघडलेले नाते सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, जेव्हापासून सलमानला काळवीट हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले, त्या दिवसापासून अर्जुन सलमानच्या दोन्ही बहिणींच्या संपर्कात आहे. सलमानबद्दल त्याला चिंता वाटत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला अर्जुन त्याची किती काळजी करतो हे सांगण्यात आले होते. पण यावर सलमानने काय प्रतिक्रिया दिली हे मात्र कळू शकले नाही. शिवाय अर्जुनला कोणत्याही सिनेमांत घेऊ नका असेही सलमान कोणाला बोललेला नाही. पण सलमानशी कटुता नको म्हणून कोणताही निर्माता अर्जुनला त्याच्या सिनेमात घेण्यास उत्सुक नाही.

मलायका अरोरा, अर्जुन कपूर

जेव्हा बोनी कपूरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता, तेव्हा सलमानने कोणतेही मानधन न घेता नो एण्ट्री सिनेमात काम केले होते. सलमानसोबतच्या संबंधांमुळेच बोनी यांनी अर्जुनला मलायकापासून दूर राहण्यास सांगितले होते. पण अर्जुनने मात्र काही ऐकले नाही. जेव्हा सलमानला अर्जुन आणि मलायकाच्या अफेअरबद्दल कळले होते तेव्हा सलमान अर्जुनशी याबाबत बोललाही होता. मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटाला सलमान अर्जुनला जबाबदार मानतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 1:56 pm

Web Title: arjun kapoor try to be friendly with salman khan malaika arbaaz khan divorce reason
Next Stories
1 ‘आज देशाची मान शरमेनं खालावली’
2 65th national film awards : शेतकरी कुटुंबातल्या पंकज त्रिपाठीची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर
3 कपिलची जागा घेणार हा कॉमेडियन? ट्विटरवर दिलं स्पष्टीकरण
Just Now!
X