गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वारे वाहत असून अनेक अभिनेते, अभिनेत्री विवाहबंधनात अडकले आहेत. त्यामुळे ‘इश्कजादे’ चित्रपटातून चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण करणारा अभिनेता अर्जुन कपूर कधी लग्न करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे अर्जुनच्या आजीने मनातल्या मनात एका अभिनेत्रीला त्यांची नातसून मानलं आहे. अर्जुनने नुकत्याच या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जुन कपूर आणि परिणिती चोपडा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यापूर्वी ‘इश्कजादे’ या चित्रपटामध्ये ही जोडी एकत्र झळकली होती. तेव्हापासून ही जोडी अर्जुनच्या आजीला आवडली आहे. विशेष म्हणजे परिणितीने अर्जुनबरोबर लग्न करावं अशी त्याच्या आजीची इच्छा असल्याचं अर्जुनने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

‘परिणिती माझी चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे तिचं माझ्या घरी येणं-जाणं असतं. त्यामुळे ती माझ्या आजीला विशेष आवडते. आमच्या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री तिला आवडत असून ऑफस्क्रिन सुद्धा एकत्र असावं असं माझ्या आजीला वाटतं’, असं अर्जुनने म्हटलं.

दरम्यान, काही दिवसापूर्वी ‘माझी बहीण रिया आणि अंशुला यांचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, असं अर्जुनने सांगितलं होतं. त्यामुळे आजीच्या मनात कितीही असलं तरीदेखील अर्जुन पुढील काही वर्ष तरी लग्न करणार नसल्याचं दिसून येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoors dadi grand mother says parineeti chopra is perfect bride for him
First published on: 19-09-2018 at 12:06 IST