27 February 2021

News Flash

बापरे ! अर्जुन कपूरला मिळालंय धमकीचं पत्र!

पत्रामुळे सध्या कपूर कुटुंबातील वातावरण पूर्णत: बदलून गेल्याचं पाहायला मिळतंय.

व्यस्त कामकाजातून वेळ काढत कौटुंबिक जबाबदाऱ्या पाडत असलेला अर्जुन कपूर सध्या त्याचा जास्तीत जास्त वेळ त्याच्या बहिणींना देताना दिसून येत आहे. बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या चारही मुलांमधील अंत कमी झाला आहे. काही दिवसापूर्वीच जान्हवीने अर्जुनचा वाढदिवस सेलिब्रेट केला असून त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहीली होती. जान्हवीच्या या पोस्टनंतर या भावंडांच्या नात्यातील ओलावा दिसून येत आहे. त्याप्रमाणेच अर्जुनदेखील आता घरचा कर्तापुरुष झाल्याप्रमाणे कुटुंबाची काळजी घेत आहे. मात्र या चांगल्या घटना घडत असतानाच अर्जुन कपूरला एक धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रामुळे सध्या कपूर कुटुंबातील वातावरण पूर्णत: बदलून गेल्याचं पाहायला मिळतंय.

‘मुबारकाँ’ चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या अर्जुनचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं आहे. मात्र या चर्चा जशा झाल्या तशा त्या वाऱ्याबरोबर विरल्याही. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत.मात्र तरीदेखील अर्जुन लग्नाचं नाव काढत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच त्याला हे धमकीचं पत्र मिळालं असून हे पत्र सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

३३ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अर्जुनने अद्यापही लग्नाचा विचार न केल्यामुळे त्याच्या लग्नाची चिंता त्याच्या घरातल्यांना सतावत आहे. याच कारणामुळे अर्जुनच्या आजीनेच त्याला धमकीच पत्र पाठविल्याचं सांगण्यात येत आहे.’लवकरात लवकर लग्न कर’ असा मजकूर या पत्रात लिहीला असून त्याखाली अर्जुनच्या आजीने तिचं नाव लिहीलं आहे.

आजीने पाठविलेलं हे पत्र पाहताच अर्जुनला आश्चर्याचा धक्का बसला आणि हसूही फुटल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आजीने पाठविलेली ही गोड धमकी अर्जुने शेअर केली आहे. हे पत्र व्हायरल होताच अर्जुनच्या चाहत्यांनीही त्याच्याकडे लग्न करण्याचा आग्राह धरल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शेअर केलेल्या फोटोवर अर्जुनने एक छानशी कॅप्शनही दिली आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या आजीचं असं गोड धमकीचं पत्र येतं. त्यात आर्जव असतो, काळजी असते आणि लाचदेखील दिली असते अशी ही धमकी त्यावेळी छान वाटते, असं अर्जुनने लिहीलं आहे. विशेष म्हणजे हे पत्र पाहिल्यानंतर अर्जुनच्या काही चाहत्यांनी त्याला परणीती चोप्राबरोबर लग्न करण्याचा सल्लाही दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 11:57 am

Web Title: arjun kapoors grandmother asks him to get married soon
Next Stories
1 Sanju : प्रदर्शनापूर्वीच ‘संजू’ चित्रपट झाला लीक
2 संजयला भेट देण्यासाठी दिया मिर्झानं दीड लाखांत खरेदी केलं ‘मदर इंडिया’चं पोस्टर
3 TOP 5 : रणबीरच्या ‘या’ पाच चित्रपटांनी चाखली कोट्यवधींच्या कमाईची ‘बर्फी’
Just Now!
X