News Flash

अपडेट: अर्जुन कपूरची बहिण अंशुलाला रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

तिचं ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल बिघडली होती. अंशुलाला पाहण्यासाठी तिचे वडील बोनी कपूर आणि सावत्र बहिण जान्हवी कपूर हे दोघेही रूग्णालयात आले होते.

तिचं ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल बिघडली होती. अंशुलाला पाहण्यासाठी तिचे वडील बोनी कपूर आणि सावत्र बहिण जान्हवी कपूर हे दोघेही रूग्णालयात आले होते.

फिल्म निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूर याची बहिण अंशुला कपूरला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. गेल्या शनिवारी ५ जून रोजी अंशुलाची तब्बेत बिघडल्याने तिला हिंदूजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिचं ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल बिघडली होती. अंशुलाला पाहण्यासाठी तिचे वडील बोनी कपूर आणि सावत्र बहिण जान्हवी कपूर हे दोघेही रूग्णालयात आले होते. जान्हवी कपूरचे फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अंशुला कपूर हिला तिचं ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल तपासण्यासाठी रूग्णालयात आणलं होतं. ही एक सामान्य तपासणी होती आणि काही दिवसांतच ती बरी होईल, असं सांगण्यात आलंय.

अंशुला कपूर ही बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांची मुलगी आहे आणि अर्जुन कपूरची सख्खी बहिण आहे. जान्हवी कपूर आणि खूशी कपूर या तिच्या सावत्र बहिणी आहेत. पण तरीही त्यांच्यामध्ये घट्ट नातं आहे. अनेकदा या सगळ्यां जणींना एकत्र पाहण्यात आलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor)


याशिवाय अभिनेता अर्जुन कपूर आणि बहिण अंशुला कपूर या दोघांचं ऑनलाइन सेलिब्रिटी फंडराइजिंग प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून ते करोना महामारीच्या काळात लोकांना देशभरातून मदत करत आहेत. भाऊ-बहिणीच्या या जोडीने आतापर्यंत ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळवून लोकांना आणि त्यांच्या कुटुंबाला मदत केली आहे. यासोबतच अंशुला मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करताना दिसून येत असते. सोशल मीडियावर ती नेहमीच सकारात्मक संदेश शेअर करताना दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 8:55 pm

Web Title: arjun kapoors sister anshula kapoor hospitalised janhvi kapoor pay her a visit prp 93
Next Stories
1 आई कुठे काय करते : अनिरुद्ध घेणार अरुंधतीसोबत घटस्फोट?
2 ‘सुशांत प्रमाणे तुझाही मृत्यु होऊ शकतो’, सोशल मीडिया पोस्टवरून मोहितची पोलिसात तक्रार
3 ‘शेरनी’मधील विद्याची भूमिका पाहता महिला वन अधिकाऱ्यांनी केले कौतुक
Just Now!
X