News Flash

तैमूरनंतर सोशल मीडियावर सुरु आहे ‘या’ स्टार किडची चर्चा

जाणून घ्या स्टार किड विषयी..

बॉलिवूड कलाकारांसोबतच स्टार किड्स देखील सतत चर्चेत असतात. त्यामध्ये सैफ अली खान आणि करिनाचा मुलगा तैमूर, कुणाल खेमू आणि सोहा अली खानची मुलगी इनाया, शाहरुख आणि गौरी खानचा मुलगा अब्रहम, शाहिद आणि मीरा कपूरची मुलगी मीशा यांचा समावेश आहे. मात्र असा एक स्टारकिड आहे जो लाइमलाइटपासून दूर आहे पण अतिशय क्यूट आहे. हा स्टारकिड म्हणजे अभिनेता अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डिमेट्रिएड्सचा मुलगा.

अर्जुन आणि गॅब्रिएलाच्या मुलाचे नाव आरिक आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ हे सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच आरिकचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो आईसोबत चालताना दिसत आहे. दरम्यान आरिक अतिशय क्यूट दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

अर्जुन रामपालने पत्नी मेहर जेसिला घटस्फोट दिल्यानंतर तो गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे. अर्जुनला दोन मुली आहेत. मिहिका आणि मायरा. त्यानंतर जुलै २०१९मध्ये तो पुन्हा बाबा झाला. तेव्हा त्याने त्याच्या मुलाचे नाव आरिक ठेवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 6:33 pm

Web Title: arjun rampal and gabriella demetriades son arik video avb 95
Next Stories
1 सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार ‘राधे’ चित्रपट
2 चक दे इंडिया… ! भारताच्या ऐतिहासिक विजयावर शाहरुखचं खास ट्विट
3 “भारतीयांना कमी समजू नका”; ऐतिहासिक विजयावर सनी देओल यांनी व्यक्त केला आनंद
Just Now!
X