करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लॉकडाउनच्या तिसऱ्या पर्वात दारुची दुकानं सुरु करण्यास सशर्त परवानगी मिळाली आहे. परंतु सरकारच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम झुगारुन सुरु असलेली दारुची दुकानं बंद करण्याची विनंती त्याने केली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – थेट अंतराळात करणार स्टंटबाजी; अभिनेत्याची नासासोबत तयारी सुरु

“कृपया दारुची दुकानं बंद करा. दारुमुळे समाजात अराजकता पसरली आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगचे नियम झुगारुन दारुसाठी भांडणं करत आहेत. नियम, शिस्त, कायदा सर्व काही मोडलं जात आहे. ही मंडळी केवळ मार खाण्याच्या पात्रतेची आहेत.” अशा आशयाची कॉमेंट करुन अर्जुनने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “एक नव्हे तर चार बॉयफ्रेंड हवेत”; टायगर श्रॉफच्या कथित प्रेयसीचा व्हिडीओ व्हायरल

अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मद्यपी दारुसाठी गडबड गोंधळ करताना दिसत आहेत. पोलीस या गर्दीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण याने देखील एक व्हिडीओ पोस्ट करुन दारु दुकानं सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता.