News Flash

ओठांवरुन ट्रोल करणाऱ्यांना अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचे उत्तर

तिने सोशल मीडियावर स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केला होता.

सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जिकडे अनेक लोकं एकमेकांशी जोडलेले असतात. कधीकधी तर काही लोकांचे संपूर्ण आयुष्य सोशल मीडियामुळे बदललेले पाहायला मिळते. पण याच सोशल मीडियावर बऱ्याचदा सेलिब्रिटींना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र अनेक कलाकार ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना देखील दिसतात. असेच काहीसे अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडसोबत घडले आहे.

काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रएलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. पण काहींनी मात्र तिला तिच्या ओठांवरुन ट्रोलही केले. पण गॅब्रएला शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला लगेच सुनावले आहे.

View this post on Instagram

New normal. Virtual creation with @taras84 ft @rampal72

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

एका युजरने कधी कधी तुझे ओठ फार विचित्र दिसतात असे म्हटले होते. त्यावर लगेच गॅब्रएलाने ‘या संदर्भात मी माझ्या आई वडिलांशी नक्की बोलून घेते’ उत्तर देत यूजरला सुनावले आहे.

अर्जुन रामपाल आणि गॅब्रएला गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा त्यांनी लग्नाआधीच एका बाळाला जन्म दिल्याने सुरु झाल्या होत्या. गॅब्रएला ही मॉडेल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 5:13 pm

Web Title: arjun rampal girlfriend gabriella demetriades shut up a troll who take a dig at her lips avb 95
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये अभिनेत्याने डॉक्टरशी बांधली लग्नगाठ
2 प्रियांका चोप्रासह अनेक सेलिब्रिटींचा खासगी डेटा हॅक; फोन रेकॉर्डिंगचीही चोरी
3 “उंच टाचांच्या चपला महिला विरोधी”; अभिनेत्रीने दिला बुट वापरण्याचा सल्ला
Just Now!
X