News Flash

“फोटो कोणी काढला रे?”, चित्र काढणाऱ्या अर्जुनला चाहत्यांचा सवाल

अर्जुन सध्या विलगीकरणात आहे.

सौजन्यः अर्जुन रामपाल इन्स्टाग्राम

गेल्या आठवड्यात अभिनेता अर्जुन रामपालला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याने स्वतःला घरात क्वारंटाईन करुन घेतलं आहे. या काळात तो बरंच काही करत आहे आणि त्याने त्याबद्दल सोशल मीडियावर शेअरही केलं आहे.

अर्जुन सध्या आपली कलात्मक बाजू पडताळून पाहत आहे. अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे की तो कॅनव्हासवर चित्र काढत आहे. त्याने या फोटोंना कॅप्शनही दिलं आहे. यात तो म्हणतो, “काहीतरी नवा प्रयत्न करतोय….क्वारंटाईन्ड…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

आज अर्जुनचा ग़ृह विलगीकरणातील पाचवा दिवस आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचे चाहते सध्या हा प्रश्न विचारतायत की अर्जुन जर आयसोलेशनमध्ये आहे तर त्याचे फोटो कोण काढत आहे? एका युजरने कमेंट करत त्याला हा प्रश्न विचारला आहे. त्यावर अर्जुन उत्तर देतो, “मी टाईमर लावून काढला आहे. वेगवेगळ्या गोष्टी सध्या करुन बघत आहे”.

यापूर्वी अर्जुनने पुस्तक वाचतानाचा फोटोही शेअर केला होती. शनिवारी त्याने आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर त्याने आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना काळजी घेण्याची आणि करोनाची चाचणी करुन घेण्याचे आवाहनही केले आहे. अर्जुन लिहितो, “मला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत परंतु तरीही मी अलगीकरणात आहे. हा आपल्या सर्वांसाठी कठीण काळ आहे. पण जर आपण काही काळ सावध आणि शहाणपणाने वागलो, तर आपल्याला त्याचे फायदे नक्की मिळतील. एकत्र येऊन आपण करोनाशी लढू शकतो आणि आपण नक्की लढू.”

अर्जुन सोनू सूद आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत ‘पल्टन’ आणि ‘नेलपॉलिश’ या चित्रपटांमध्ये दिसला होता. तो लवकरच कंगना रणौतच्या ‘धाकड’ या चित्रपटातही दिसणार आहे. त्याने नुकतंच आपल्या आगामी ‘रेपिस्ट’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 1:08 pm

Web Title: arjun rampal is quarantined at home and painting fans asked who clicked photos vsk 98
Next Stories
1 दिल थोड़ा सहम तो जाता है…; करोनाच्या वेदना अभिनेता सिद्धांतने कवितेतून केल्या व्यक्त
2 हिनाला पाहून फोटोग्राफर्सचा गोंधळ; “तिने वडिलांना गमावलंय आणि तुम्ही..” विकास गुप्ता भडकला
3 अभिनेता चिरंजीवीची मोठी घोषणा! सिने कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस
Just Now!
X