25 February 2021

News Flash

NCB करणार कारवाई? ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरु असताना अर्जुन रामपालने सोडला देश

लंडनमध्ये आहे अर्जुन रामपाल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींची नाव समोर आली आहेत. सध्या या प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याची चौकशी सुरु आहे. मात्र, या तपासादरम्यानच अर्जुन देश सोडून गेल्याचं सांगण्यात येत आहे. अर्जुनला १६ डिसेंबर रोजी चौकशीसाठी राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तो चौकशीसाठी उपस्थित नव्हता.

ड्रग्स प्रकरणी अर्जुनला चौकशीचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार, १६ तारखेला त्याची एनसीबीकडून चौकशी होणार होती. मात्र, या चौकशीला उपस्थित राहण्याऐवजी त्याने २२ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. सध्या अर्जन कामानिमित्त लंडनमध्ये असून त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

अर्जुन लवकरच ‘नेल पॉलिश’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून त्याची लंडनमध्ये शुटींग सुरु आहे. त्यामुळेच अर्जुन चौकशीसाठी हजर राहू शकला नाही असं ‘नेल पॉलिश’ चित्रपटाच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या टीमने सांगितलं.

दरम्यान, अर्जुनपूर्वी चौकशीदरम्यान देश सोडून जाणारे अनेक कलाकार आहेत. यात सपना पब्बीचा देखील समावेश आहे. सपनाला नोटीस मिळाल्यानंतर ती लंडनला गेली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 2:14 pm

Web Title: arjun rampal left the country amid ncb investigation ssj 93
Next Stories
1 प्रेग्नंसीचा ड्रामा उघड! नेहाने ‘त्या’ फोटोवर केला खुलासा
2 “पालकांनी काही संस्कार केले की नाही?”; राखीच्या शिव्या ऐकून निक्कीची आई संतापली
3 सनासारख्या फ्लॉप अभिनेत्रीसोबत लग्न का केलं?; अनसने ट्रोलर्सला दिलं जोरदार प्रत्युत्तर
Just Now!
X