21 October 2020

News Flash

अर्जुन रामपालने शेअर केला मुलासोबतचा पहिला फोटो

१७ जुलै रोजी अर्जुनला पूत्ररत्न झाला

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या रिलेशसनशीपमुळे चर्चेत होता. १७ जुलै रोजी अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रएलाला पूत्ररत्न झाला. अर्जुन आणि त्याचे संपूर्ण कुटुंब नव्या पाहुण्याच्या येण्याने फार आनंदी असल्याचे दिसत आहे. अर्जुनने नुकताच त्याच्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने मुलाचा हात पकडला आहे. फोटो शेअर करत त्याने ‘Ufffff….’ असे लिहिले आहे. गॅब्रएलाने देखील हाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अर्जुनला पूत्ररत्न होताच अर्जुनच्या दोन्ही मुली नव्या पाहुण्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. अर्जुनचे संपूर्ण कुटुंब नव्या पाहुण्याच्या येण्याने आनंदी असल्याचे म्हटले जात आहे.

अर्जुन आणि मेहर यांचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झाला नसून अर्जुन गॅब्रएलासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. आता गॅब्रएलाला पूत्ररत्न झाला आहे. गॅब्रएलाच्या प्रेग्नंसीविषयी मला कोणतीही तक्रार नासल्याचे याआधी मेहरे सांगितले होते. त्यामुळे गॅब्रएलाच्या डोहाळजेवणामध्ये मेहरचे महत्वाचे योगदान होते.

दरम्यान, ‘मिस इंडिया’चा किताब पटकावणाऱ्या मेहर जेसिया आणि अर्जुनने वीस वर्षांपूर्वी विवाहगाठ बांधली होती. पण, गेल्या काही वर्षांपासून दोघांमधील मतभेद वाढू लागल्याने अखेर विभक्त होण्याचा टोकाचा निर्णय या दोघांनी घेतला. या निर्णयानंतर अर्जुन त्याच्या आयुष्यात पुढे वळाला असून तो गेल्या काही काळापासून गॅब्रएलाला डेट करताना दिसत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 11:21 am

Web Title: arjun rampal share a photo of his new born baby avb 95
Next Stories
1 ‘सुपर ३०’ची सेंच्युरी!
2 ‘सेक्रेड गेम्स २’च्या कथेबद्दल सैफ अली खानने केला हा खुलासा
3 Video : आईसोबत या गाण्यावर थिरकला सलमान खान
Just Now!
X