सध्या बॉक्स ऑफीसवर शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट धुमाकूळ घालतोय. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. सुपरहिट तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा हिंदी रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या व्यक्तीरेखेला दक्षिणेत लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती अभिनेता विजय देवरकोंडा याने. ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटानंतर तो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत त्याची प्रसिद्धी झाली. ३० वर्षीय हा अभिनेता सध्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे.
‘गीता गोविंदम’ या तेलुगू चित्रपटात विजयने त्या अभिनेत्रीसोबत काम केलं होतं. ही अभिनेत्री आहे रश्मिका मंदाना. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली. अनेकदा या दोघांना एकत्रही पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर रश्मिकाने कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीसोबतचा साखरपुडा मोडला. हा साखरपुडा तिने विजयसाठी मोडला असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
विजय आणि चित्रपटसृष्टीतील त्याचे काही मित्र चित्रपट पाहण्यासाठी बाहेर गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत रश्मिकासुद्धा असल्याचं पाहिलं गेलं. चित्रपटानंतर विजय व रश्मिका कॅफेमध्ये गेल्याचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 1:18 pm