27 October 2020

News Flash

‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण

करण जोहरच्या चित्रपटात साकारणार भूमिका

विजय देवरकोंडा

‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळवली. केवळ दक्षिणेतच नव्हे तर संपूर्ण भारतात या चित्रपटाचा बोलबाला झाला. त्यानंतर ‘कबीर सिंग’ या नावाने त्याचा हिंदी रिमेकसुद्धा बॉक्स ऑफिसवर गाजला. या चित्रपटाच्या निमित्ताने विजय देवरकोंडा हे नाव प्रकाशझोतात आलं. तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या विजयच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. ‘कबीर सिंग’मधील भूमिकेसाठी त्याला विचारणा झाली होती. मात्र तेव्हा त्याने नकार दिला होता. आता विजयच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विजय लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून करण जोहरच्या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारणार आहे. खुद्द करणनेच ट्विटरद्वारे याविषयीची माहिती दिली.

‘डिअर कॉम्रेड’ हा विजयचा तेलुगू चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लगेचच करणने त्याचे हक्क विकत घेतले. त्याचा हिंदी रिमेक करण प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. यामध्ये विजय मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री रम्या कृष्णनचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या चित्रपटासाठी विजयने बरीच मेहनत घेतली असून त्यातील लूकसाठी त्याने विशेष डाएटसुद्धा केला आहे.

‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात विजयसोबत रश्मिका मंदाना आणि श्रुती रामचंद्रन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचं कथानक एका विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि राज्य स्तरीय महिला क्रिकेटपटू यांच्याभोवती फिरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 4:23 pm

Web Title: arjun reddy star vijay deverakonda all set for his bollywood debut ssv 92
Next Stories
1 अतुल गोगावले लवकरच दिसणार नव्या रुपात
2 या अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न
3 अभिनेता की अभिनेत्री? ओळखून दाखवाच…
Just Now!
X