सलमान खानवर असलेला काळविट शिकाराचा खटला अद्याप मिटलेला नाही. त्याच्यावर या प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे. या प्रकरणाबाबत त्याला जबाब नोंदविण्यासाठी गुरुवारी न्यायालयात हजर राहावयाचे होते. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे सलमान न्यायालयात उपस्थित राहू शकला नाही.
सलमानच्या वकिलांनी त्याची तब्येत ठीक नसल्याचे कारण देत पुढची तारीख देण्याची विनंती केली. यावर मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश अनुपमा बिजलानी यांनी सलमानला २९ एप्रिलला न्यायालयात हजर राहावयास सांगितले आहे. सलमान खान सध्या पहलगाम येथे बजरंगी भाईजान चित्रपटाची शुटिंग करत आहे. या चित्रपटात त्याची सह कलाकार करीना कपूर आहे. तिच्यासोबत पुढील एक महिना तो खोर्‍यातील विविध लोकेशन्सवर शुटींग करणार आहे. हा चित्रपट यावर्षी ईदच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे.