‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता अभिजीत केळकर नवीन कॅप्टन झाला आहे. अभिजीतने प्रतिस्पर्धी आरोह वेलणकरचा पराभव केला. कॅप्टन्सी टास्कनंतर घरातील मंडळी निवांत एकमेकांशी गप्पागोष्टी करण्यात रमले. वूटच्या ‘अनसीन अनदेखा’च्या नवीन क्लिपमध्ये आरोह त्‍याच्‍या वडिलांबाबत सांगताना दिसत आहे.

आरोह त्‍याच्‍या वडिलांचे गाणे गाण्‍यास सुरूवात करतो. अभिजीत त्‍याबाबत विचारतो. उत्‍साहित होत नेहा बोलते, ”त्‍याच्‍या बाबांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आहे, त्‍यामुळे तो म्‍हणतोय,” याबाबत त्‍याच्‍या अवतीभोवती असलेले सर्वजण (शिवानी, शिव, अभिजीत आणि नेहा) गाण्‍याची प्रशंसा करतात

बाबांविषयी आरोह सांगतो, ”माझे बाबा हे खूप वर्ष गाणं शिकले. २२ वर्ष त्यांनी संगीतासाठी दिली. ते गाण्यांच्या कार्यक्रमांमध्येही भाग घ्यायचे. पण भावाच्या जन्मानंतर ते हळूहळू संगीतापासून दूर गेले.” यावेळी आरोह त्‍याचे स्‍वप्‍न सांगतो, ”माझं एक स्‍वप्‍न आहे. तंबुरा, तबला हे माझ्या घरातील माळ्यावर आहेत. निवृत्तीनंतर बाबांनी फुल टाइम गाणं सुरू करावं अशी माझी इच्छा आहे आणि भारतातल्या सर्वोत्तम ठिकाणी त्यांनी कॉन्सर्ट करावं असं माझं स्वप्न आहे. तिथे प्रेक्षकांमध्ये बसून मी निवांतमध्ये बाबांचं गाणं ऐकेन.”

आरोहने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री केली. त्याच्या येण्याने घरातील स्पर्धकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.