News Flash

अर्पिताच्या लग्नाला सलमान-शाहरुखची अनोखी भेट

सलमान आणि शाहरुखच्या चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा सुखद धक्का देणारे हे छायाचित्र लवकरच फेसबुक आणि ट्विटरवर प्रसिद्ध होईल याबाबत काही शंका नाही.

| November 17, 2014 11:00 am

सलमान आणि शाहरुखच्या चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा सुखद धक्का देणारे हे छायाचित्र लवकरच फेसबुक आणि ट्विटरवर प्रसिद्ध होईल याबाबत काही शंका नाही. बॉलीवूडमधले खान वैर तर सर्वांनाच ज्ञातच आहे. पण, आपल्या बहिणीच्या लग्नाकरिता हे दोघेही खान एकत्र आले आहेत. इतकेच नाही तर अर्पिताच्या मेहंदी कार्यक्रमाच्या वेळी या दोघांनी तिच्या डोक्यावर चुंबन घेतनाचे छायाचित्र अर्पिताने शेअर केले आहे.
salmansrk
लवकरच लग्नगाठीत अडकणा-या अर्पिताचा मेहंदीचा कार्यक्रम मुंबईत झाला. त्यावेळी सलमान आणि शाहरुख तिच्यावर चुंबनाद्वारे आपल्या प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. अर्पिताच्या लग्नासाठी मला कोणत्याही निमंत्रणाची गरज नसल्याचे शाहरुखने पत्रकारांशी बोलताना सांगितले. माझे अर्पिताशी खूप जवळचे नाते आहे, त्यामुळे मी तिच्या लग्नाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन, असेही तो म्हणाला
हैद्राबाद येथील फालाक्नुमाल पॅलेस येथे अर्पिता आणि आयुष शर्माचा लग्नसोहळा पार पडणार आहे. १८ नोव्हेंबरला त्यांचे लग्न असून २१ नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2014 11:00 am

Web Title: arpita khan mehendi brothers salman khan and shah rukh khan together
Next Stories
1 दिया मिर्झाकडे मधुचंद्रासाठी वेळ नाही!
2 टॉम क्रुझचे कोट्यवधींचे अलिशान घर विक्रीला
3 मी एक साधा माणूस! कोणालाही फसवत नाही, अथवा खोटं बोलत नाही – रणवीर सिंग
Just Now!
X