‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता आठ आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी शो शेवटच्या टप्प्यात आलेला असतानाच प्रत्येक स्पर्धक ‘बिग बॉस’मध्ये टिकून राहण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या प्रयत्नांचं रुपांतर अनेकदा भांडणामध्ये देखील होतं. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री राखी सावंत आणि अर्शी खान यांच्या बाबतीत घडला आहे. दोघांनीही मर्यादांचं उल्लंघन करत थेट एकमेंकांच्या शरीराबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

अवश्य पाहा – आई म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला सनी लिओनीचं प्रत्युत्तर; म्हणाली, हा मुलगा तर…

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

अर्शी आणि राखी या दोन्ही अभिनेत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. बिग बॉसच्या घरात दोघांनाही वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळाली आहे. परंतु या संधीचं सोन करण्याऐवजी दोघंही एकमेकांसोबत यथेच्च भांडताना दिसत आहेत.

अवश्य पाहा – ‘अशी लोकच हिंसेला प्रोत्साहन देतात’; योगराज सिंग यांच्या भाषणावर दिग्दर्शक संतापला

राखी शोमध्ये आल्यापासून वारंवार अर्शीच्या मेकअपवर निशाणा साधत आहे. तुझं शरीर प्लास्टिक सर्जरी आणि सिलिकॉनने भरलेलं आहे. तुझं नाक खोटं आहे ते कधीही खाली पडू शकतं. तू चेटकीणीसारखी दिसतेस मेकअप करुन काही फायदा नाही असे टोले ती वारंवार अर्शीला देत आहे. परंतु अर्शी देखील कच्च्या गुरुची चेली नाही तिने देखील राखी सावंतच्या प्लास्टिक सर्जरीवर निशाणा साधला. हा शो तरुणांचा आहे तुझ्यासारख्या म्हाताऱ्यांचा नव्हे. असं म्हणत तिने राखीच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील टीका केली. अर्थात राखी आणि अर्शी शोच्या बाहेर देखील एकमेंकांवर वारंवार टीका करत असतात. या पार्श्वभूमीवर दोघांचं भांडण बिग बॉसच्या घरात आता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.