27 January 2021

News Flash

‘पौरुषपूर’चा रचियेता

सात ते आठ भागांच्या या वेब मालिके चे दिग्दर्शन सच्चिंद्र वत्स यांनी केले आहे.

‘हम दिल दे चुके सनम’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘लगान’ यासारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे कलादिग्दर्शन करणारे मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाई ‘पौरुषपूर’ या वेब मालिके चे कलादिग्दर्शन करत आहेत. अभिनेत्री शिल्पा शिंदे, मिलिंद सोमण, अन्नू कपूर, शाहीर शेख आणि फ्लोरा सैनी यांची प्रमुख भूमिको असलेल्या या वेब मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे. सात ते आठ भागांच्या या वेब मालिके चे दिग्दर्शन सच्चिंद्र वत्स यांनी केले आहे. या वेबमालिके विषयी नितीन देसाई सांगतात की, यात समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीविरोधात तसेच महिलांना मिळणारी असमान वागणूक याविरोधात भाष्य करण्यात आले आहे. यात अन्नू कपूर पौरुषपूर राजाची भूमिका साकारत आहेत. पौरुषपूरची पत्नी राणी मीरावती आणि राजातील तणाव विकोपाला जातो. त्याच दरम्यान राणी मीरावती राज्यातून गायब होऊन शत्रू बोरीसशी हातमिळवणी करते. यात मिलिंद सोमण हे बोरीस नावाच्या तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहेत. या मालिके साठी पौरुषपूरच्या राजाचा महाल हाही कथेचा एक महत्त्वाचा भाग होता, त्यामुळे निर्माती एकता कपूर आणि टीमशी सातत्याने के लेल्या चर्चेतून आणि अभ्यासातून हा महाल प्रत्यक्षात साकारल्याचे त्यांनी सांगितले.

‘कथेत नाटय़ दाखवण्यासाठी सेटचे डिझाइन तेवढेच भव्यदिव्य करणे आवश्यक होते. राजाचा महाल साकारताना त्याची उंची, रंगसंगती, त्याचे प्रकार ठरवताना खूप बारकाईने अभ्यास केला गेला.  यासाठी आम्ही टीमशी तासन्तास चर्चा केली. त्याचा प्रासाद, झुंबर, कसा बनवता येईल हे तपासून पाहिले. ही मालिका पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना तीच भव्यदिव्यता अनुभवता येईल. पौरुषपूरचा वध झाल्यावर मिलिंद सोमण साकारत असलेल्या बोरीसचा महाल साकारणे तेवढेच आव्हानात्मक होते. प्रेक्षकांना ही मालिका पाहताना ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सारखे कलादिग्दर्शन पाहिल्याचा भास होईल’, असेही त्यांनी सांगितले.

करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत कर्जत येथील नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओही जवळजवळ सहा ते सात महिने बंद होता. टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर महिन्याभरापूर्वी एनडी स्टुडिओ सुरू करण्याची परवानगी मिळाली आणि आम्ही शासनाचे करोनाचे सर्व नियमांचे पालन करत काम सुरू केले. करोनामुळे सर्वाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. पुन्हा पहिल्यापासून कामाचा श्रीगणेशा केल्याचे देसाई सांगतात. इतिहासात तसेच पौराणिक कथेतील काळ पुन्हा पडद्यावर सेटच्या माध्यमातून उभा करण्यास त्यांना खूप आवडतो. नुकतेच सलमान खानच्या एका चित्रपटाचे चित्रीकरणही येथे करण्यात आले. स्टुडिओत चित्रीकरणासाठी एकमेकांपासून विशिष्ट अंतर ठेवून सेट उभारण्यात आले आहेत. सेटवर सध्या मर्यादित युनिट कार्यरत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याची तापमान नोंद, आंतरनियमांचे पालन केले जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कलादिग्दर्शनात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न

कलादिग्दर्शक नितीन देसाई हे सतत वेगळे देण्याचा प्रयत्न करतात. कलादिग्दर्शनात कारकीर्द करू पाहणाऱ्या तरुणांना रंगसंगती तसेच चित्रकलेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. याआधी चित्रपट, मालिकेच्या कथेनुसार कसा सेट उभारता येईल याचे आकलन झाले पाहिजे. यासाठी सुरुवातीची काही वर्षे एखाद्या कलादिग्दर्शकाच्या हाती काम करावे. हे प्रत्यक्ष ज्ञान अनुभव आणि आकलनातूनच मिळते, असा सल्ला ते तरुण कलादिग्दर्शकांना देतात. नितीन देसाई हे दिल्ली येथील ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’च्या समितीवर आहेत. कला दिग्दर्शनासाठी देशात मोठय़ा प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 2:44 am

Web Title: art director nitin desai making set for web series paurashpur zws 70
Next Stories
1 चरित्र मालिकांची शोकांतिका..
2 Coolie No 1 movie review : उथळ पाण्याचा खळखळाट
3 वादात सरले सारे..
Just Now!
X