02 March 2021

News Flash

ज्यांच्या सेटवरून चित्रपट निर्माण झाला..!

अंधेरी पूर्वेकडील महाकाली येथील कमालीस्तान स्टुडिओत महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘तेरा मेरा साथ रहे’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते.

|| दिलीप ठाकूर

अंधेरी पूर्वेकडील महाकाली येथील कमालीस्तान स्टुडिओत महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘तेरा मेरा साथ रहे’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. महेश मांजरेकरांच्या हिंदी चित्रपटाच्या सेटवर त्या काळात जाण्याचा योग येई. तसाच या चित्रपटाच्या सेटवर गेलो तेच एकदम गिरगावातील चाळीत पोहोचल्याचा अनुभव आला. या चित्रपटाचा नायक (अजय देवगण) या चाळीत राहतो वगैरे अनेक गोष्टी या सेटवर चित्रित झाल्या. असा हुबेहूब सेट लावणारे कला दिग्दर्शक कोण?, असा प्रश्न पडणे स्वाभाविक होतेच आणि याचे उत्तर मिळाले, ‘आर. वर्मन’. ज्येष्ठ कलादिग्दर्शक आर. वर्मन यांचे नुकतेच निधन झाले. एकेकाळी हिंदूी चित्रपटसृष्टीत कला दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या आर. वर्मन यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा मिळाला.

ऐंशी-नव्वदच्या दशकातील आघाडीच्या कला दिग्दर्शकांतील एक हुकमी नाव म्हणजे आर. वर्मन. त्यांना मराठी बऱ्यापैकी बोलता येत असल्याने अनेकदा भेटीचे योग येत. गप्पांमध्ये त्यांच्याकडून कळलं की मांजरेकरांच्या ‘तेरा मेरा साथ रहे’ चित्रपटासाठी लावलेला चाळीचा सेट तसाच आणखी काही आठवडे कायम राहणार आहे. असं काही समजलं की अनेकदा तरी त्यामागचे कारण हे स्टारच्या तारखा जुळणे ही समस्या असते. पण आर. वर्मन यांनी वेगळीच गोष्ट सांगितली. त्यांनी केलेला गिरगावच्या चाळीचा हुबेहूब सेट महेश मांजरेकरांना खूप आवडला. इतका मोठा सेट तयार आहे म्हणून मांजरेकरांनी याच सेटवर चाळीतील आयुष्याची गंमत रंगवणाऱ्या ‘प्राण जाए पर शान न जाए’ या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले. निर्माते आर. पचरिशा यांना त्यांनी सांगितलेली कल्पना आवडली. आणि त्यांनी होकार देताच चित्रीकरणही सुरू झाले. या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत.

आर. वर्मन यांची आणखी एक खासियत होती. एकदा मेहबूब स्टुडिओत त्यांनी दिग्दर्शक राकेश रोशनच्या ‘खुदगर्ज’ या चित्रपटासाठी एका श्रीमंत कुटुंबाच्या मुख्य हॉलचा भव्य सेट लावला होता. त्या सेटवर मीडियाला आवर्जून बोलावल्याने या सेटची चर्चा वाढली आणि मग त्याच सेटवर कल्पतरू दिग्दर्शित ‘घर घर की कहानी’ आणि टिटू शर्मा निर्मित ‘ऐसा प्यार कहां’ या चित्रपटांचेही चित्रीकरण झाले. हे चित्रपट पाहताना एकाच सेटवर या तीन चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याचे लक्षात येईल. पांढरा शुभ्र रंग अधिकाधिक प्रमाणात वापरणे आणि एकाच वेळेस दोन-तीन ठिकाणी आपल्या चित्रपटाचे सेट लागत असतील तर तेथे आवर्जून भेट देणे हेही त्यांचे वैशिष्टय़. क पटकथेनुसार स्टुडिओत सेट उभे करतानाच बाह्य़ चित्रीकरण स्थळांचाही शोध आवश्यक आहे हे ते महत्त्वाचे मानत. त्यामुळेच त्यांनी अनेक मोठय़ा निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांच्या चित्रपटाचे कला दिग्दर्शन केले असावे. त्यांनी कला दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांची संख्या साडेतीनशे आहे यावरून त्यांचे सातत्य आणि यश लक्षात येते. यामध्ये ‘अंदाज अपना अपना’, ‘ऐतराज’, ‘कंपनी’, ‘बिवी नंबर वन’, ‘परदेस’, ‘रंगीला’, ‘बाजीगर’, ‘खून भरी मांग’, ‘काला बाजार’, ‘भगवानदादा’, ‘हीरा और पत्थर’, ‘कोयला’, ‘दरार’, ‘आशा’, ‘जीत’ या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांच्या नावावरूनच त्याचे मोठे निर्माता आणि दिग्दर्शक लक्षात येतात.

आर. वर्मन यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात पब्लिसिटी डिझायनर म्हणून केली होती, पण ते सत्तरच्या दशकातील कला दिग्दर्शक सुधेन्दू रॉय यांच्याकडे साहाय्यक म्हणून रमले. रॉय यांचे मेहबूब स्टुडिओत ऑफिस होते आणि त्यांनी ‘आपकी खातिर’, ‘सौदागर’ (नूतन, अमिताभ बच्चन) अशा चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. या अनुभवातून आर. वर्मन घडत गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 11:15 pm

Web Title: art director r verman
Next Stories
1 “लोकांना न्यूड सिनेमेच पाहायचे असतील, तर ते पॉर्न पाहू शकतात”
2 प्रभास अमेरिकन उद्योगपतीच्या मुलीशी लग्न करणार?
3 ‘बिग बॉस’च्‍या घरात का होतेय किंग खानची चर्चा?
Just Now!
X