कॉलेज आठवणींचा कोलाज : अश्विनी महांगडे, अभिनेत्री

मी मूळची वाईची. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मी वाईतच पूर्ण केलं. किसन वीर महाविद्यालय हे माझं कॉलेज. जिथे मी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली.मी आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे फार पैसे जवळ कधीच नसायचे.मला अजूनही आठवतंय तेव्हा एक ‘मिसळ’ आम्ही ४-५ जण मिळून खायचो. शेयरींगची भावना जास्त असल्यामुळे आमची मैत्री खूप घट्ट होती. गावाकडे असून सुद्धा आमच्या मैत्रीत कोणी गरीब-श्रीमंत असा भेदभाव न्हवता.ना कोणाची जात वा धर्म आमच्या मैत्रीच्या नात्यात आड येत होता.याच क्षणाने शिकवले की माणूस महत्वाचा ‘जात’ नाही.

DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
IPL Star RCB Cameron Green 60 Percent Working Kidney Tells diet to control
६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?
2nd April Tuesday Marathi Panchang Rashi Bhavishya
२ एप्रिल पंचांग: शेअर बाजारात फायदा ते जोडीदाराचं आरोग्य, आजच्या अष्टमीला तुमच्या राशीत काय लिहिलंय?

कॉलेजला प्रवेश घ्यायला गेले. आणि चांगलाच प्रताप करून घरी आले. त्याच झालं असं मी आणि माझा भाऊ आम्ही दोघ कॉलेजमधली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेलो होतो. घरी परत येत असताना माझी ओढणी बाईकच्या चाकामध्ये अडकली. आणि मी पडले. तेव्हा मला खूप लागल. तो माझ्या आयुष्यातला भयंकर दिवस होता. तेव्हापासून आजही बाईकवर स्त्री असेल आणि ओढणी उडत असेल तर ओरडून सांगते की ओढणी सावरा.

मी शाळेत असल्यापासूनच नृत्यात अग्रेसर  होते.ज्याची खबर कॉलेजमध्ये कोणालाच नव्हती. कला गुणांना वाव मिळणारम्य़ा युथ फेस्टिव्हल मध्ये माझा नंबर लागला तो ‘पथनाटय़’ मध्ये.पण मला नृत्यातच पुढे जायच होत.मिळालेले काम चोख करणे हे कर्तव्य मी तेव्हा तिथे बजावले.आणि आमचं पथनाटय़ जिंकल.कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी नृत्य स्पर्धा भरवल्या जायच्या. पदवीच्या दुसरम्य़ा वर्षांला असताना आमच्या वर्गाने त्यात भाग घेतला आणि पहिला Rमांक पटकावला. तेव्हा सगळ्या कॉलेजला आणि माझ्या फ्रेंड सर्कलला कळाल की मी डान्स करतेय. अभिनयासाठीच पोषक वातावरण मला कॉलेजमध्ये मिळाल.

सांस्कृतिक विभाग म्हंटल की, त्यातली मुल वर्गात कमी अन बाहेच्या कामांमध्येच खूप गुंतलेली असतात.आम्हीही तसेच कॉलेजचा अविस्मरणीय किस्सा म्हणजे,माझा वाढदिवस होता अन दिवसभर मला कोणीही शुभेच्छा दिल्या नाहीत.मी सगळ्यांवर खूप चिडले होते.

कारण त्या दिवशी कोल्हापूरला स्पर्धेसाठी आम्ही गेलो होतो. घरापासून एवढी दूर कोल्हापूरला अन त्यात दिवसभर अस वातावरण माझ्या आजूबाजूला होत जे मला सहन झाल नाही.रात्री ८ वाजता मी घरी फोन करून हे सगळ रडून सांगत होते. कोणाजवळ मी माझं हे दु:ख सांगू अस मला झाल होत.  वाढदिवस संपायला साधारण तीन- चार तास राहिलेले .मला माझी मैत्रीण आकांक्षा बोलवायला आली की जेवायला चल. मी तिच्याशी न बोलताच खाली गेले तर कॅन्टीन मध्ये पूर्ण अंधार आणि एक टेबलवर केक दिसला मेणबत्तीच्या उजेडात.मला काय बोलावे काही समजलेच नाही. अन मी ढसाढसा रडायला लागले.लाईट लावले आणि सगळे माझ्यावर हसत होते. माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट वाढदिवस.

एक वर्ष युथ फेस्टिव्हलच्या नृत्य स्पर्धेसाठी सराव चालू होता. राजू सर तेव्हा आमचे स्टेप्स बसवत होते. काही स्टेप्स आम्हाला तितक्या पटल्या नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्या नकळत काही स्टेप्स बदलल्या. स्पर्धेत आम्ही उत्तम थिरकलो. मात्र जी स्टेप बदलली नेमकी तीच स्टेप करत असताना  माझी मैत्रीण आकांक्षा पडली आणि हात फ्रॅक्चर झाला.आमचा हेतू चांगला होता मात्र मार्ग चुकीचा. तेव्हापासून कानाला खडा की जे असेल ते स्पष्ट बोलेन.

पदव्युत्तर शिक्षणासाठी मी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्याच ठरवलं. जे मी किसन वीर महाविद्यलयातच घेतल.किचन प्रॅक्टिकलला आम्ही वेगवेगळे डिश बनवायचो. मी माळकरी आणि त्यात मला एक दिवस चिकन बिर्याणी बनवायला लागली.  अंगावर शहारे आणत कशीबशी मार्क्‍स मिळवण्यासाठी मी बिर्याणी बनवली. आणि मोकळी झाले. कॉलेजचा शेवटचा दिवस अजून आलेलाच नाही कारण आजही मी एन.एस.एसच्या कॅम्पला आवर्जून जाते.

शब्दांकन : मितेश जोशी