News Flash

‘मी पण सचिन’मध्ये अभिजीत-स्वप्निलची जुगलबंदी

बऱ्याच दिवसांनी दोन चांगले कलाकार पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

काही दिवसांपूर्वीच ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर पाहून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता स्वप्निल जोशीबरोबर अभिनेता अभिजीत खांडकेकरचा चेहराही दिसतो आहे. बऱ्याच दिवसांनी दोन चांगले कलाकार पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

सध्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील ‘गुरुनाथ’च्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘मी पण सचिन’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. खरे तर क्रिकेट आणि आयुष्याचा खूप जवळचा संबंध आहे. क्रिकेटमध्ये जसे शेवटच्या टप्प्यापर्यंत काही सांगता येत नाही, आयुष्याचेही अगदी तसेच असते. चित्रपटातील ‘आयला आयला सचिन आयला’ हे जोशपूर्ण गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

क्रि केट आणि आयुष्यातील हे साम्य दाखवणारा, प्रेम, नात्याची परिभाषा शिकवणारा आणि आपल्या स्वप्नांचा माग घेण्यास प्रवृत्त करणारा हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात स्वप्निल जोशी, अभिजीत खांडकेकर या दोघांबरोबरच प्रियदर्शन जाधवचीही महत्त्वाची भूमिका असून हा चित्रपट देशभरातच नाही तर जागतिक स्तरावरही प्रदर्शित केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 1:09 am

Web Title: article about mi pan sachin marathi movie
Next Stories
1 श्रेयस तळपदे गुंडाच्या भूमिकेत
2 ‘रंगवैखरी’ची महाअंतिम फेरी आज मुंबईत
3 उत्कंठावर्धक चकवा : ‘गुमनाम है कोई!’
Just Now!
X