12 July 2020

News Flash

ऑस्कर फॅशनची न्यारी तऱ्हा!

गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी विविध सटल आणि सॉफ्ट रंगांचा वापर केला होता तर या वर्षी पूर्णपणे विरुद्ध रंग वापरले गेले

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

ऑस्करच्या रेड कार्पेटवरची फॅशनही जगभरातील फॅशनप्रेमींसाठी पर्वणी असते. इथे येणाऱ्या जगभरातील अभिनेत्रींचे पेहराव, त्यांच्या अदा यांची चर्चा ऑस्कर सोहळा संपला तरी चवीचवीने सुरू असते..

भले मोठे सेट्स, रेड कार्पेट, ऑस्कर पुरस्काराची ट्रॉफी, झगमगतं वातावरण, कॅमेरा आणि लाइट्स अशा कितीतरी गोष्टींचे आकर्षण या ऑस्कर पुरस्कारांबद्दल असते. ऑस्कर सोहळा हा मुळातच आकर्षणाचा केंद्रबिंदू असला तरी त्याहूनही अधिक ग्लॅमरस ठरते ती या सोहळ्यातील सेलिब्रिटींची फॅशन. या सोहळ्यात जगभरातील नामवंत कलाकार मंडळी एका व्यासपीठावर येण्याचा योग जुळून येत असल्याने प्रत्येकाची फॅशन अंगीकारण्याची आणि ती पोहोचवण्याची पद्धत वेगळी असते. #ऑस्कर २०२० हा हॅशटॅग सगळीकडे फिरत असल्याने एकंदरीत जगभरातून या सोहळ्याला मिळालेली लोकप्रियता आणि त्याचसोबतच या सोहळ्यातील फॅशनचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने आवडलेल्या सेलिब्रिटींची फॅशन बऱ्यापैकी लोकांकडून सोशल मीडियावर शेअर केली जात होती.

या वेळी सेलिब्रिटींच्या फॅशनचा आढावा घेतला तर जास्त फिक्या रंगाचे आऊटफिट्स सगळ्यांनी टाळलेले पाहायला मिळाले. शेड्सचा वापर जास्त केला गेला आणि हायलायटेड रंगांचाही वापरही (जास्त करून गाऊन्समध्ये) केला होता. शेड्समध्ये लाल रंगासारखे भडक रंग टाळून मरून, पांढरा, काळा, ग्रे या रंगांच्या छटा जास्त वापरल्या होत्या. थोडे सौम्य असे हे रंग होते. कुणाच्याही आऊटफिट्च्या पॅटर्न्‍समध्ये तोचतोचपणा नव्हता?. स्टाइलिंगमध्ये एकसुरीपणा जाणवला असता पण त्यातही कलर कॉम्बिनेशन आणि ज्वेलरी स्टाइल्समध्ये प्रयोग केले असल्याने ते लुक वेगळे ठरले. एरव्ही काहीतरी धाडसी फॅशन करण्याचा प्रयोग सेलिब्रिटी करताना दिसतात, मात्र या वेळी ही धाडसी प्रायोगिकता बाजूला ठेवत स्मार्ट फॅ शन करण्यावर जास्त भर होता, असे दिसून आले. यंदा पॅटर्न्‍सचा लुक पहिला तर शिमर, ग्लिटर, वेलवेट, ग्लॉसी, फॉइल, शाइन्स असे प्रकार जे सर्वसामान्यांनाही ज्ञात आहेत तसे पॅटर्न्‍स वापरले होते ज्यात सिक्विन हॉल्टर गाऊन, रहिनोस्टोन हुडेड बॉल गाऊन, कलर ब्लॉक गाऊन, रफल गाऊन, कस्टम एम्ब्रॉयडरी गाऊन्स, शीअर वर्सेस गाऊन्स, मल्टिकलर टूले गाऊन्स, नेव्ही टूले स्ट्रॅपलेस गाऊन्स, पफ स्लिव्ड गाऊन, फ्रिगल्ड गाऊन आणि त्यासोबतच स्लिक, वूल आणि क्रिस्टल गाऊनही परिधान केले होते.

बालकलाकार ते ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्वानी चमकदार फॅशनचा फंडा अजमावला होता. सर्वाच्या पॅटर्न्‍समध्ये, शेड्समध्ये, कव्र्समध्ये आणि एम्ब्रॉयडरीमध्ये विविधता होती. फॅ शन म्हटले की आधीच्या अभिनेत्री, मॉडेल यांच्याशी आजच्या कलाकारांच्या फॅ शनची तुलना कायम केली जाते.मार्लिन मन्रो, ऑडी हेपबर्न यांच्या फॅ शनचा आजही मापदंड म्हणतच विचार करत त्यांची आत्ताच्या हॉलीवूड अभिनेत्रींशी तुलना केली जाते. किंबहुना कु ठल्याही नामवंत व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या फॅशनची तुलना रेट्रो फॅशनशी होते. मागल्या वर्षी कान महोत्सवाच्या निमित्ताने प्रियंका चोप्रा आणि प्रिन्सेस डायना यांच्या फॅशनची तुलना केली गेली होती, तसंच या वर्षी ऑस्कर २०२०च्या निमित्ताने अभिनेत्री अ‍ॅन्जेलिना जोली आणि अभिनेत्री ऑडी हेपबर्न यांच्या फॅ शनची तुलना केली गेली. गंमत म्हणजे ही तुलना त्यांच्यातील वेगळेपण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील साम्य काय आहेत हे शोधण्यासाठी केली जाते. आणि मग समाजमाध्यमांवरून त्यांना ट्रोलही केलं जातं. उदाहरणार्थ, अभिनेता एलटॉन जॉनने घातलेल्या जॅकेटवरून ‘द जोकर’ चित्रपटातील जोकरच्या जॅकेटशी साम्य शोधून तसं मीम तयार केलं गेलं तर अभिनेत्री क्रिस्टन विंग्सच्या ड्रेसला ट्रोल केलं गेलं कारण तिने आऊट ऑफ द ट्रेण्ड असलेला आणि त्यातही लाल रंगाचा ड्रेस परिधान केला जो सबंध सोहळ्यात आजवर कुणीच केला नव्हता.

गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी विविध सटल आणि सॉफ्ट रंगांचा वापर केला होता तर या वर्षी पूर्णपणे विरुद्ध रंग वापरले गेले. त्याचबरोबर सस्टेनेबल फॅशन आणि रिसायकल्ड फॅशनचाही अवलंब केलेला या वेळी पाहायला मिळाला. अभिनेत्री अ‍ॅरियेना हफिंगटन हिने ऑस्कर २०१३ च्या सोहळ्यातील तिचा काळा गाऊन या वेळी पुन्हा घातला. तर अभिनेत्री एलिझाबेथ बॅक्सनेही तिचा २००४ सोहळ्यातील मरून गाऊन परिधान केला होता. अभिनेता जोआकिन फिनिक्सने तोच लुक आणि ब्लॅक ब्लेझर परत घातला. यासोबतच अभिनेत्री जेन फोन्डाचेही आहे? आणि सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अभिनेत्री रिटा मोनेरॉचं. या दिग्गज अभिनेत्रीने १९६२ सालच्या ऑस्कर सोहळ्यातील तिचा काळा आणि सोनेरी गाऊन परिधान केला होता, जी खरंच खूप मोठी गोष्ट होती.

दरवर्षीप्रमाणे बेस्ट ड्रेस्ड आणि वर्स्ट ड्रेस्ड अशीही सेलिब्रिटींची वर्गवारी केली गेली. सर्वात देखणं रूप आणि आकर्षक चेहरा म्हणून अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सनवर शिक्कामोर्तब झाले तर अभिनेत्यांमध्ये जॉय मॅगॅनेलियो यांनी ऑक्सर २०२० गाजवला असं म्हणायला हरकत नाही. या पुरस्कार सोहळ्यातील फॅशनचं वैशिष्टय़ म्हणजे कुणी आपल्या आऊट ऑफ द बॉक्स फॅशनने लोकप्रिय होतं तर कुणी त्यांच्या साध्या फॅशनने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुणी त्यांच्या योग्य फॅशन निवडीसाठी लोकप्रिय होतं तर कुणी चुकीची फॅशन निवडल्याने सोशल मीडियावरून ट्रोल होत मिळणाऱ्या प्रसिद्धीचे धनी होतात. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वेळी सेलिब्रिटींच्या फॅशनने या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आपले रंग भरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 4:44 am

Web Title: article on celebrity oscar fashion abn 97
Next Stories
1 नाट्यरंग : बारोमास अस्वस्थानुभव!
2 ‘बदलती नाती विशद व्हायला हवीत’
3 पाहा नेटके : अफसोस.. पश्चाताप न होणारा
Just Now!
X