करोना काळात घरात बसून कं टाळलेल्या लोकांना दर्जेदार मनोरंजनाची प्रतीक्षा आहे, मात्र अजूनही राज्यात पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. शिवाय, प्रेक्षक चित्रपटगृहात येणार का?, ही भीती असल्याने अजूनही हिंदीसह मराठी चित्रपट निर्मातेही चित्रपट प्रदर्शित करायला तयार नाहीत. एकीकडे दाक्षिणात्य चित्रपट सध्या चित्रपटगृहांमधून गर्दी खेचताना दिसत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट निर्मात्यांनीही एकत्रित येऊन परिस्थितीचा विचार के ला पाहिजे, अशी अपेक्षा ‘झी टॉकीज’चे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर यांनी व्यक्त केली. नवनव्या लेखकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘झी टॉकीज’ वाहिनीने ‘कथायण चषक स्पर्धे’चे आयोजन केले आहे. यानिमित्ताने ‘लोकसत्ता’शी बोलताना जानवलेकर यांनी सद्य परिस्थितीत मराठी चित्रपट निर्मात्यांसमोर असलेल्या आव्हानांकडे लक्ष वेधले. याही परिस्थितीत नियोजनपूर्वक चित्रपट प्रदर्शनाचा विचार झाला, तर दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांनाही फायदा घेता येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

‘झी टॉकीज कथायण चषक’ या स्पर्धेमागचा उद्देश स्पष्ट करताना राज्यभरात इतके  भाषा-प्रदेश वैविध्य असताना लेखकांची संख्या मात्र तुलनेने कमी जाणवते. अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळत नाही हेही लक्षात आले. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून लेखकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि या स्पर्धेतून ज्या उत्कृष्ट कथा येतील त्यांना थेट निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न वाहिनीच्या माध्यमातून के ला जाईल, अशी माहिती जानवलेकर यांनी दिली. गेलं वर्षभर टाळेबंदी असल्याने अनेकांनी ओटीटीचा मार्ग धरला, त्यामुळे प्रेक्षकांना हरतऱ्हेचा आशय घरबसल्या उपलब्ध झाला आहे. मात्र ज्या वेगाने ओटीटी माध्यमे सर्वदूर पसरली आहेत ते पाहता चित्रपट, मालिका-वेबमालिका असे कितीतरी मनोरंजनाचे पर्याय सध्या उपलब्ध झाले आहेत. लेखकांसाठी ही सुवर्णसंधी असून या माध्यमांसाठी चांगली आशयनिर्मिती हे आव्हान ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले.

या स्पर्धेअंतर्गत लेखकांकडून त्यांच्या मूळ कथा मागवण्यात आल्या होत्या. पहिल्याच प्रयत्नात या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून उत्तमोत्तम कथा आपल्याकडे आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या स्पर्धेत निवडलेल्या कथांवर ‘झी टॉकीज’कडूनच चित्रपट निर्मिती के ली जाणार का?, या प्रश्नाला उत्तर देताना ‘झी टॉकीज’साठीच याचा प्राधान्याने विचार करत होतो. मात्र ‘झी टॉकीज’ची चित्रपटनिर्मितीची आर्थिक समीकरणं वेगळी आहेत. त्यामुळे कथेनुरूप ‘झी स्टुडिओ’कडूनही चित्रपट निर्मिती के ली जाऊ शकते. आमच्याकडून निर्मिती होईलच, मात्र या कथा चित्रपटसृष्टीत विविध निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाहेरच्या निर्मात्यांकडून जर या कथांना प्रतिसाद मिळाला तर खऱ्या अर्थाने ते या स्पर्धेचे फलित म्हणता येईल, असेही त्यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीचा विचार करता वाहिनीचीही आर्थिक गणितं बदललेली आहेत, हे ते मान्य करतात. सध्या पूर्णपणे नवीन चित्रपटांपेक्षा करोना काळात रखडलेले चित्रपट आधी प्रदर्शित करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. लोक घरी बसून कं टाळले आहेत, त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये पुरेशी काळजी घेऊन चित्रपट दाखवले तर प्रेक्षकसंख्या निश्चित वाढेल, असे मत त्यांनी व्यक्त के ले. सकारात्मक संदेश-विचार देणारे किं वा निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती जास्त असेल, असेही त्यांनी सांगितले. मात्र सध्या मराठीत पहिला चित्रपट कोण प्रदर्शित करणार?, याचीच प्रत्येक जण वाट पाहतो आहे. त्याऐवजी निर्मात्यांनी एकत्रित येऊन काही नियोजन करायला हवे, तरच या परिस्थितीतून मार्ग काढता येईल, असेही जानवलेकर यांनी स्पष्ट केले.