चित्रपट, जाहिराती, वेबमालिका, टीव्ही शोज अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सक्रिय असलेले कलाकार अनेकदा माहितीपूर्ण कार्यक्रमांमध्ये फारसा सहभाग घेताना दिसत नाहीत. आमिर खानचा ‘सत्यमेव जयते’सारखा शो सोडला तर हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार एकं दरीतच माहितीपूर्ण शो किं वा कार्यक्रमांचा भाग होताना दिसत नाहीत. मात्र वेगवेगळा जॉनर घेऊन आलेल्या ओटीटी माध्यमांनी काही प्रमाणात ही गणितं बदलली आहेत, याची प्रचीती सध्या ‘डिस्कव्हरी प्लस’ या ओटीटी माध्यमावर येऊ घातलेल्या नवीन कार्यक्रमांमुळे येते आहे. मनोज वाजपेयी, रणदीप हुडा, राणा डुग्गुबाती असे तीन कलाकार या माध्यमावरील कार्यक्रमांशी जोडले गेले आहेत.

मार्च महिन्यात सुरू झालेल्या ‘डिस्कव्हरी प्लस’ने सध्या नवनवीन कार्यक्रमांची निर्मिती सुरू केली आहे. त्यातही भारतीय शोची संख्या वाढवण्यावर भर देणाऱ्या या मंचाने कलाकारांनाही या कार्यक्रमांशी जोडून घेण्याचा प्रयत्न के ला आहे. सध्या या ओटीटीवर ‘मिशन फ्रं टलाइन’, ‘लडाख वॉरिअर्स – सन्स ऑफ द सॉइल’ आणि ‘सिक्रे ट्स ऑफ सिनौली – डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी’ असे तीन नवीन शो दाखल होणार आहेत. जैसलमेरमध्ये सीमेवर लढणाऱ्या जवानांबरोबर प्रत्यक्ष राहून त्यांच्या अडचणी, आव्हाने समजून घेण्याचा प्रयत्न अभिनेता राणा डुग्गुबाती याने ‘मिशन फ्रं टलाइन’ या शोमधून के ला आहे. ‘स्नो वॉरिअर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाखमधील सैन्यदलाच्या खास तुकडीतील जवानांचे प्रशिक्षण, गोठवणाऱ्या थंडीत सगळ्यात उंच पर्वतराजीवर असलेल्या प्रशिक्षणतळावर चालणारे त्यांचे प्रशिक्षण, त्यांच्या शौर्यगाथा सांगणाऱ्या या शोचे सूत्रसंचलन अभिनेता रणदीप हुडा याने के ले आहे, तर उत्तर प्रदेशातील सिनौली गावात झालेले उत्खनन आणि त्यातून बाहेर पडलेला इतिहास ‘सिक्रे ट्स ऑफ सिनौली – डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी’ या शोमधून उलगडणार आहे. अभिनेता मनोज वाजपेयी आणि निर्माता-दिग्दर्शक नीरज पांडे अशी दोन मोठी नावं या शोशी जोडली गेली आहेत. नीरज पांडे यांनी हा शो सादर केला असून मनोज वाजपेयी यांनी सूत्रसंचालन केले आहे. हे तिन्ही शो ९ डिसेंबरपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.