शहरीकरणाच्या प्रक्रियेत हरवत चाललेली नाती, नात्यांमधील वाढती गुंतागुंत हा नेहमीच दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या चित्रपटांचा विषय राहिला आहे. ‘हॅप्पी जर्नी’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा अभिनेता अतुल कुलकर्णीबरोबर त्याची जोडी जमली आहे. ‘कॅफे कॅमेरा’ या बॅनरखाली त्यांनी ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बदलत्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे असे या ‘राजवाडे’ कुटुंबाचे म्हणणे आहे. कुटुंबाबद्दलच्या आपल्याच व्याख्यांच्या चौकटीत बसून कुटुंबातील सगळ्या सदस्यांना एकत्र बांधण्याचा अट्टहास त्यांना एकमेकांपासून दूर घेऊन जातो. त्यापेक्षा तुमचे ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना मोकळे करा, त्यांना त्यांचे स्वातंत्र्य द्या. तुम्ही मनाने एकत्र राहाल, असा विचार या चित्रपटातून देताना कुटुंबाबरोबर एकत्र राहताना तुमच्या ‘स्वत्वा’ची जाणीव असणेही तितकेच महत्त्त्वाचे ठरते. राजवाडे कुटुंबाच्या तीन पिढय़ा आणि त्यांच्या सदस्यांच्या माध्यमातून ही कथा सांगितली असल्याने हे कुटुंब ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात अवतरले होते. त्यांच्याबरोबर रंगलेल्या या गप्पा…

कुटुंबपट ही आजच्या समाजाची गरज

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

सध्या समाजात ‘आम्ही सगळे’ ते ‘मी स्वत:’ अशी प्रवृत्ती वाढायला लागली असून त्या पाश्र्वभूमीवर एक माणूस म्हणून कुटुंब चित्रपट मांडावा ही गरज वाटायला लागली. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’मधून एका उद्योजक कुटुंबाची कथा प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उद्योजक कुटुंबाच्या कथेतील या कुटुंबाने स्वत:चे आयुष्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही तर एकमेकांशी मनाने जोडले जाणे म्हणजे कुटुंब आहे. नेहमीच्या कौटुंबिक चित्रपटापेक्षा हा चित्रपट खूप वेगळा आहे. एकत्र कुटुंबात राहताना सुरक्षितता वाटत असली तरी ती कधी कधी घातक ठरू शकते. एकत्र कुटुंबाचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. भूतकाळाकडे ‘स्मरणरंजना’च्या चष्म्यातून पाहू नका, असे सांगणारा हा चित्रपट आहे. एकत्र कुटुंबात होणारी तगमग ही वर्तमान आणि भूतकाळाकडे पाहण्याची आहे. कुटुंबातील सर्वाना एकत्र बसून पाहता आणि आनंद घेता येईल असा हा चित्रपट आहे.
-सचिन कुंडलकर,  दिग्दर्शक

आमच्या पिढीवर दडपण

आमच्या पिढीवर खूप दडपण आहे. आई-वडील किंवा कुटुंबातील मोठय़ा व्यक्तींकडून नको तेवढी काळजी घेतली जाते. आम्हाला जे मिळाले नाही ते आम्ही तुम्हाला देतोय, अशी एक भावना त्यामागे असते. अर्थात, या भावनेचा मला अनादर करायचा नाही. पण कधी कधी हे नकोसे होते. अति काळजीमुळे आपल्याला आयुष्यात पुढे काही जमेल का, आपण यशस्वी होऊ का, असा प्रश्न पडतो. एका ठरावीक मर्यादेपर्यंत काळजी करणे ठीक आहे. मुलांना थोडे स्वातंत्र्य द्या, त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या, निर्णय चुकला तर ते धडपडतील, त्यांना लागेल. पण यातूनच ते शिकत मोठे होतील.
-सिद्धार्थ मेनन

कुटुंब संकल्पना..

‘कुटुंब’ संस्थेची व्याख्या आणि संकल्पना नव्याने तयार करण्याची आज आवश्यकता आहे. एकत्र येणे आणि लांब फेकले जाणे हे कुटुंबात होत असते. कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला अहंगंड किंवा न्यूनगंड असू नये. सध्याच्या बदलत्या काळात रक्ताच्या नात्याची माणसेच म्हणजे कुटुंब असे म्हणता येणार नाही. समाजात वेगवेगळ्या निमित्ताने एकत्र आलेली मंडळी हेही कुटुंबच म्हणता येईल.
-आलोक राजवाडे

वेगळा प्रवास

मी मूळची नाशिकची आहे. पण गेली काही वर्षे मी पुण्यात एकटी राहते आहे. माझे घर, कुटुंब आणि शहर सोडून मलादुसऱ्या शहरात जाऊन राहण्याची परवानगी मला माझ्या कुटुंबाने दिली. केवळ त्यामुळे मला वेगळा प्रवास करता आला.
-कृत्तिका देव

स्वत:ला सिद्ध करणे गरजेचे

आयुष्यात प्रत्येकालाच स्वत:ला सिद्ध करण्याची एक तगमग असते. आयुष्यात मी कोण होणार, मी काय करणार हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करणे महत्त्वाचे असते.
-मृण्मयी गोडबाले

चित्रपट म्हणजे जोखीमच..

गेली चाळीस वर्षे मी एका कंपनीत प्रकल्प राबविण्याचेच काम करतो आहे. चित्रपट तयार करणे म्हणजे  कंपनीचा प्रकल्प राबविण्यासारखेच आहे. कंपनीच्या एखाद्या प्रकल्पात तो चांगला झाला आहे किंवा नाही याबाबत अंदाज बांधता येऊ शकतो. पण चित्रपटाबाबत तसे म्हणता येणार नाही. तो अनिश्चिततेचा भाग आहे. लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती आदी सर्व घटक खूप चांगले असले तरी चित्रपट तयार झाल्यानंतर प्रेक्षक तो स्वीकारतील का? ते सांगता येत नाही. त्यामुळे चित्रपट निर्मिती म्हणजे ‘रिस्क मॅनेजमेंट’ आहे. चित्रपट निर्मिती करावी, अशी लहानपणापासून इच्छा होती. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’च्या निमित्ताने ती पूर्ण होत आहे. सचिन कुंडलकर व अतुल कुलकर्णी यांनी जेव्हा मला कथा ऐकविली तेव्हा ती मला आवडली. एका श्रीमंत उद्योजक कुटुंबाची ही गोष्ट असली तरी ती प्रातिनिधिक असून त्यातील विचार सार्वभौम आहे. चित्रपट निर्मितीच्या अनिश्चित क्षेत्रात बँका, वित्तीय संस्थांकडून चित्रपटनिर्मितीसाठी आर्थिक मदत करण्यासाठीची पद्धतशीर व्यवस्था होणे आवश्यक आहे. चित्रपट निर्मिती क्षेत्र म्हणजे काळा पैसा, कलाकार किंवा अन्य संबंधित मंडळींशी लेखी करार नसतो असे गैरसमज असतात. मात्र, मला तसा कोणताही अनुभव आला नाही. आमच्या संपूर्ण चमूने अत्यंत पारदर्शकतेने सर्व काम केले आहे. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ही संपूर्ण कुटुंबाची गोष्ट आहे.
-यशवंत देवस्थळी, निर्माते

मनाने जोडले जाणे महत्त्वाचे

‘कॅफे कॅमेरा’ मी व कुंडलकर आमची दोघांची कंपनी आहे. जर व्यवस्थित नियोजन केले तर ठरविल्याप्रमाणे आपल्याला आपले काम पूर्ण करता येते. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ हा त्या नियोजनानुसार पूर्ण झालेला चित्रपट आहे. निर्माता व दिग्दर्शकाबरोबरच निर्मितीच्या सर्व बाजूंचे नियोजन करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. निमिष दधीच यांनी कार्यकारी निर्माता म्हणून ही जबाबदारी चोख पार पाडली आहे. कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवर जर खरोखरच प्रेम असेल तर त्याला प्रेमात बांधून ठेवू नका. त्याला स्वतंत्र होऊ द्या. आमचा चित्रपट म्हणजे बदलत्या काळातले, बदलत्या शहरातले, बदलते कुटंब आहे. कुटुंब हे समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आहे. समाजाच्या सध्याच्या अवस्थेत कुटुंबातील प्रत्येकाने एकमेकांना समजून घेणे, संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. आपली पाळेमुळे कुटुंबात घट्ट रुजलेली असतील आणि आपण मनाने एकमेकांशी जोडलेले असलो तर एकत्र न राहताही आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहात असलो तरीही आपण एकत्र कुटुंबातील असू शकतो. कुटुंबात आपली मते दुसऱ्यांवर न लादता एखाद्याला त्याच्या मनाने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे ही सहिष्णुततेची सुरुवात आहे.
अतुल कुलकर्णी

मधली पिढी अडकलेली

‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ चित्रपटात मी मधल्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो आहे. आधीच्या पिढीचे ऐकायचे आणि पुढच्या पिढीला स्वातंत्र्य द्यायचे, अशा अवस्थेत ही मधली पिढी अडकलेली असते. चित्रपटाची कथा, भूमिका एखादा अभिनेता किंवा अभिनेत्रीला आवडली तर अन्य गोष्टी गौण ठरतात. मी आणि मृणाल आम्ही याअगोदर एकत्र काम केले होते. पण मी व अतुल पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. चित्रपटात मी, अतुल व मृणाल आम्ही तिघेही भावा-बहिणीच्या भूमिकेत आहोत आणि खरोखरच हे आमच्यासाठीही वेगळे आहे.
  -सचिन खेडेकर

कुटुंबासमोर धरलेला आरसा

‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’हा माझ्यासाठी वेगळा आणि महत्त्वाचा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे प्रत्येक कुटुंबासमोर धरलेला आरसा असून आरशावरील धूळ हलक्या हाताने पुसली गेली आहे. माझी भूमिका ही एकत्र कुटुंबात सुरक्षित वाढलेल्या आणि लवकर लग्न झालेल्या स्त्रीची आहे. माझा नवरा हा घरजावई आहे. सुरक्षित वातावरणात वाढलेल्या या स्त्रीला बाहेरच्या जगात वावरायची आणि तोंड द्यायची भीती वाटते. एका ठरावीक वयानंतर स्त्रीला एकाकीपण येते. तिला बरेच काही करायचे असते पण अनेकदा संसार, मुले, घरकाम यात तिला ते करता येत नाही. अनेक क्षण हातातून निसटून गेलेले असतात. अशा वेळी तिला कुटुंबातील सर्वानी समजून घेणे महत्त्वाचे असते.
-मृणाल देव-कुलकर्णी