News Flash

सुजय डहाकेचा ‘केसरी’ डाव

प्रत्येकोत काही नवीन देणाऱ्या सुजयचा हा चित्रपट कसा असेल यासाठी प्रेक्षकांना २८ फेब्रवारीर्पयच वाट पाहावी लागणार आहे.  

(संग्रहित छायाचित्र)

‘शाळा’, ‘आजोबा’, ‘फुंतरू’ यांसारखे यशस्वी चित्रपट देणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता सुजय डहाके कुस्तीवरील ‘केसरी – २ंऋऋ१ल्ल’ हा चित्रपट घेऊन आला आहे. प्रत्येकोत काही नवीन देणाऱ्या सुजयचा हा चित्रपट कसा असेल यासाठी प्रेक्षकांना २८ फेब्रवारीर्पयच वाट पाहावी लागणार आहे.

‘केसरी – २ saffron’ या चित्रपटात एका सामान्य घरातील कुस्तीगिराच्या जिद्दीचा प्रवास मांडण्यात येणार असून यानिमित्ताने विराट मडके मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण क रणार आहे. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कुस्तीगिरांसाठी कसरत आणि खुराकासाठी लागणारा खर्च सरकार करत होते. परंतु या खेळांना आता नावापुरता राजाश्रय उरला आहे. कुस्ती रांगडा खेळ असला तरी त्याचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य घरातील मुलगा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न बघतो आणि ते पूर्णत्वास कसे नेतो याचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात विराट मडके, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी,  प्रवीण तरडे, नंदेश उमप या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे संकलन दिग्दर्शन सुजय डहाकेचे असून लेखन नियाज मुजावर यांनी केले आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत दिलेल्या या चित्रपटाला क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी, संजय टेम्भूर्णी यांच्या गीते केली आहेत. ‘सामन्यासारखा सराव दररोज केला तर सराव केल्यासारखा सामना निघून जाईल’ असा विश्वास देणारा वस्ताद आणि एका सामान्य कुटुंबातील पहिलवान ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी काय मेहनत घेतात, संघर्ष करतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना २८ फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 3:07 am

Web Title: article on sujay dahakes kesari upcoming movie abn 97
Next Stories
1 मराठी प्रेक्षकांना भीती घालणारा ‘काळ’
2 चित्र चाहुल : रिअ‍ॅलिटीची धामधूम
3 शबाना आझमींच्या प्रकृतीसाठी लतादीदींपासून स्वरा भास्करपर्यंत कलाकारांनी केल्या प्रार्थना
Just Now!
X