टा़ळेबंदीच्या शिथीलीकरणानंतर आता नवनव्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येऊ घातल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अण्णा आणि शेवंता या दोन व्यक्तिरेखांमुळे लोकप्रिय झालेली  ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून त्या जागी ‘देवमाणूस’ दाखवली जाणार आहे.

‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
Director Actor Jitendra Barde movie Morya marathi movie
जातीच्या दुष्टचक्राची वास्तव मांडणी

‘झी मराठी’वर ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात ‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असून यात ‘लागीर झालं जी’ मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. समाजात अनेक माणसे गोड बोलून दुसऱ्यांना फसवतात. आपल्या सभोवताली असेलल्या वाईट प्रवृत्तीवर ही मालिका भाष्य करणार आहे. गावात एक बोगस डॉक्टर येऊन तो आपल्या बोलघेवडय़ा स्वभावामुळे भाबडय़ा लोकांना फसवतो. अल्पवधीतच देवमाणूस म्हणून प्रसिध्द झालेला डॉक्टर काय कारनामे करतो हे या मालिके त दाखवण्यात येणार आहे. साताऱ्यात या मालिके चे चित्रिकरण होणार असून ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिके चे दिग्दर्शक राजू सावंत हेच याही मालिके चे दिग्दर्शन करणार असल्याचे सांगितले जाते.

गेली काही वर्ष सातत्याने दहानंतरचा वेळ हा भयकथांच्या शैलीतील मालिकांसाठी दिला जातो आहे. त्यामुळे ‘रात्रीस खेळ चाले २’च्या जागेवर येणाऱ्या ‘देवमाणूस’ या मालिके तही थरार अनुभवायला मिळणार यात शंका नाही. मालिके च्या प्रोमोवरूनच ते सध्या प्रेक्षकांना जाणवते आहे.

‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये आता शेवंताचा मृत्यू झाला असून सध्या तिचे भूत अण्णा नाईकांच्या मानगुटीवर बसले आहे. कधीही कोणालाही न घाबरणारे अण्णा नाईक सध्या प्रचंड घाबरले आहेत.

ही मालिका ‘रात्रीस खेळ चाले’चा पूर्वार्ध म्हणून दाखवण्यात आली. आता या शेवटच्या काही भागांमध्ये आधीच्या मालिके तील कथानकाशी जोडून घेत रहस्य मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही वाहिनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.