श्रीदेवीबद्दल काही बातमी आहे काय… ती सिरियस वगैरे?.. रात्रौ दोनच्या सुमारास एका पत्रकार मित्राचा आलेला फोन हा तशीच काही वाईट बातमी घेऊन येईल असे चुकूनही वाटले नाही. पण सकाळीच पाच वाजता उठताच व्हाटस अप पाहताच प्रचंड धक्काच बसला. वय वर्षे ५४ हे काही जाण्याचे वय नाही. पण जे घडलयं ते दुर्दैवाने खूपच मोठे सत्य आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या शुभ हस्ते एका फिटनेस संदर्भातील पुस्तक प्रकाशन झाल्याच्या सोहळ्यात तिने टिकवलेला फॉर्म अर्थात आपले वजन व फिटनेस पाहून विशेषच कौतुक वाटले. तेव्हा तिने एकूणच बारीक व सडपातळ रुप पाहून तिचे खूप कौतुक वाटले. तिने आपल्या पथ्यपाण्याबाबत जे काही सांगितले ते अनेकांनी फॉलो करावे असेच वाटत होते. पण पराकोटीचे पथ्य तिला मारक ठरले की काय?

श्रीदेवीचे चित्रपटाच्या सेटवरचे वैशिष्ट्य म्हणजे ऑन स्क्रीन व ऑफ स्क्रीन याचे भान हे फार पूर्वी ‘नजराना ‘, ‘नाकाबंदी ‘, ‘खुदा गवाह ‘  ‘ गुमराह ‘ अशा चित्रपटांच्या शूटिंग कव्हरेज निमित्त अनुभवावयास मिळाले . कॅमेरासमोर उभे राहताच तिच्यात सकारात्मक बदल दिसे. दिग्दर्शकाच्या सूचना/ अपेक्षा तिने स्वीकारल्यात/ आत्मसात केल्यात हे लक्षात येई. आणि दिग्दर्शकाने दृश्य ओ. के. म्हणताच ती पटकन नाॅर्मल होताना दिसे. त्या दृश्याचे कितीही रिटेक झाले तरी ती कधीच कंटाळून जात नसे. तिचे हे वैशिष्ट्य कमालीचे वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला हवे. लाईट्स ऑफ होताच ती सेटवर एका कोपर्‍यात आपल्या आईसोबत बसलेली दिसे. अगदी शांत व आपल्याच कोशात असे. अशा वेळेस तिला मुलाखतीसाठी विचारावे तर ती म्हणायची, मम्मीसे पूछो! भारंभार मुलाखती देण्याचा तिला विलक्षण कंटाळा दिसे. त्यापेक्षा आपल्या कामात झोकून देणे तिला आवडे.

Chinmay Mandlekar expressed regret about the writers in the industry
“इंडस्ट्रीत लेखक मिळत नाहीत आणि जे आहेत त्यांना मान मिळत नाही”, चिन्मय मांडलेकरने व्यक्त केली खंत, म्हणाला…
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
savarkar
सर्वसमावेशक दृष्टिकोन

अमोल पालेकरसोबतचा ‘सोलवा सावन ‘ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. पण ती नावारूपास आली ती जीतेंद्रासोबतच्या ‘हिम्मतवाला ‘ या मसालेदार मनोरंजक चित्रपटापासून. त्यातील तिची धडाकेबाज नृत्ये लोकप्रिय झाली व ती हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करु शकली. चेन्नईवरुन ती तेव्हा मुंबईत आल्यावर तिचा मुक्काम प्रामुख्याने वांद्रा बॅण्ड स्टॅण्डच्या सी राॅक हाॅटेलमध्ये असे. कमल हसनसोबतच्या ‘सदमा मधील तिच्या अभिनयाचे कायमच कौतुक होत राहिले. पण ‘चालबाज ‘, ‘खुदा गवाह ‘, ‘लम्हे ‘ व ‘गुरुदेव ‘ या चारही चित्रपटात तिच्या दुहेरी भूमिकेतील विविधता कमालीची कौतुकास्पद आहे. त्यातून तिची अष्टपैलु अभिनेत्री अशी रेंज दिसते.

आपली मुलगी जान्हवी हिने ‘सैराट ‘ची रिमेक ‘धडक ‘व्दारे अभिनय क्षेत्रात आल्याचे  पडद्यावर पाहण्यापूर्वीच श्रीदेवीचे अनपेक्षित व कमालीचे धक्कादायक निधन झाले. ‘नगिना ‘तील तिचे ‘मै तेरा दुश्मन ‘ हे नाग नृत्य गीत कमालीचे गाजले आणि मग याच चित्रपटाचा ‘निगाहे ‘ हा सिक्वैलही आला. ‘नजराना ‘मध्ये स्मिता पाटीलचे तगडे आव्हान समोर असूनही श्रीदेवी कमालीच्या आत्मविश्वासाने उभी राहिलीय. इन्कलाब, आखरी रास्ता, चांदनी, हिंमत और मेहनत, मजाल, वतन के रखवाले अशा अनेक चित्रपटातून तिने भूमिका साकारलीय. आणि त्या काळातील आपले नंबर वनचे स्थान पटकावले/ कायम ठेवलेय. बालकलाकार म्हणूनच मल्याळम/ तमिळ चित्रपटातून काम करणार्‍या श्रीदेवीने दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातूनही बरेच काम केले. हिंदीत तिने ‘ज्युली ‘मध्ये लक्ष्मीच्या लहान बहिणीचे काम केले. मोठीच झेप व दीर्घकालीन लोकप्रियता हे तिचे विशेष होय. कालांतराने ‘इंग्लिश विंग्लीश ‘ चित्रपटातील महाराष्ट्रीयन स्त्रीच्या व्यक्तिरेखेतून पुनरागमन करतानाही तिने अभिनय व सौंदर्य यांचा छान मिलाफ दाखवला.

आज दुर्दैवाने हे सगळेच ‘द एन्ड’ झालयं. क्लायमॅक्सपूर्वीच चित्रपट संपावा असेच काहीसे झालयं…