लॉकडाउनच्या काळात दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’ व ‘महाभारत’ पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. मात्र ट्विटरवर माझ्या नावाने फेक अकाऊंट बनवून चाहत्यांची फसवणूक केली गेली, अशी तक्रार ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर अरुण गोविल यांच्या या फेक अकाऊंटला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही फसले आहेत.

अरुण गोविल यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना त्या फेक अकाऊंटवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे, मेणबत्त्या, मोबाइलचा फ्लॅश किंवा टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनला प्रतिसाद देत अरुण गोविल यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तोच व्हिडीओ त्यांच्या फेक अकाऊंटवर अपलोड केला गेला आणि त्यात पंतप्रधान मोदींनाही टॅग केलं गेलं. मोदीसुद्धा या अकाऊंटला पाहून फसले. त्यांनी ते ट्विटर अकाऊंट अरुण गोविल यांचंच समजून त्यांचे आभार मानले.

Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
anand mahindra happy with the intelligence of the girl offered her a job she had saved her sister life through alexa
VIDEO : … म्हणून आनंद महिंद्रांनी १३ वर्षांच्या मुलीला दिली नोकरीची ऑफर; म्हणाले, जर कॉर्पोरेट क्षेत्रात…

या सर्व प्रकारानंतर आता अरुण गोविल यांनी स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचा आयडी (@arungovil12) नेटकऱ्यांना सांगितला. त्याचप्रमाणे फेक अकाऊंटवर (@RealArunGovil) विश्वास ठेवू नका असंही त्यांनी चाहत्यांना सांगितलं.